मुख्यमंत्र्यांचा सावंत, शहाजीबापूंना ‘कोल्ड शॉक’; माढा, सांगोल्याची जबाबदारी दिली आपल्या खास व्यक्तीकडे

विशेष म्हणजे ठोंगे पाटील यांची निवड करताना हे दोन्ही नेते त्यावेळी उपस्थित नव्हते.
Eknath shinde-shahaji patil-Tanaji sawant-Laxmikant Thonge Patil
Eknath shinde-shahaji patil-Tanaji sawant-Laxmikant Thonge PatilSarkarnama

सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना ‘जोर का झटका धीरेसे’ दिला आहे. आरोग्य मंत्री सावंत यांचा गृहतालुका असलेला माढा आणि ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ फेम आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Patil) यांच्या सांगोला तालुक्यातील संघटनेची जबाबदारी शिंदे यांनी आपल्या खास मर्जीतील माणसाकडे सोपवली आहे. शिवसेनेत असताना शिंदेनिष्ठ म्हणून ओळख असलेल्या लक्ष्मीकांत ठोंगे पाटील (Laxmikant Thonge Patil) यांची जिल्हाप्रमुखपदी निवड करताना त्यांच्याकडे हे दोन्ही तालुके सोपविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ठोंगे पाटील यांची निवड करताना हे दोन्ही नेते त्यावेळी उपस्थित नव्हते. (Laxmikant Thonge Patil has been elected as Solapur district chief of Shinde group)

एकनाथ शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी चार जिल्हाध्यक्ष नेमले होते. त्यात अमोल शिंदे, मंगेश चिवटे, मनीष काळजे, चरण चवरे यांचा समावेश होता. आता त्यात लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांची भर पडली आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये तानाजी सावंत गटाला झुकते माप दिल्याची चर्चा जिल्ह्यात होती. शिवसेनेत असल्यापासून एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक त्यामुळे काहीसे नाराज झाल्याची कुजबूत ऐकू येत होती.

Eknath shinde-shahaji patil-Tanaji sawant-Laxmikant Thonge Patil
राष्ट्रवादीच्या कल्याणराव काळेंची पाऊले शिंदे गटाकडे?; कट्टर समर्थकाची सहसंपर्कप्रमुखपदी वर्णी

दरम्यान, तानाजी सावंत यांच्या गटाने यापूर्वी बोलावलेल्या बैठकीला ठोंगे पाटील यांच्यासह माढ्याचे संजय कोकाटे, मोहोळचे नागनाथ क्षीरसागर, सोमेश क्षीरसागर हे गैरहजर हेाते. यापूर्वी झालेल्या शिंदे गटाच्या नेमणुकीमुळे एक गट काहींसा नाराज झाला असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, ठोंगे पाटील, क्षीरसागर, कोकाटे, महेश साठे, सोमेश केचे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. या सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कानावर सोलापूर जिल्ह्यात घडणाऱ्या सर्व घडामोडी घातल्या. त्यानंतर शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांना नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे पत्र देण्याची सूचना केली.

Eknath shinde-shahaji patil-Tanaji sawant-Laxmikant Thonge Patil
पवारांचे निष्ठावंत बबनदादा, सोपल, राजन पाटलांचं नक्की काय ठरलंय!

दरम्यान, या निवडी होताना आरोग्य मंत्री सावंत आणि सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील हे मात्र गैरहजर होती. त्याची मोठी चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे. शिवसेनेत असताना ठोंगे पाटील यांची ओळख एकनाथ शिंदे समर्थक अशीच होती. त्यामुळेच शिंदे यांनी आपल्या खास निकटवर्तीयाची माढा आणि सांगोला तालुक्याचे जिल्हाप्रमुख म्हणून निवड केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in