लक्ष्मण माने राष्ट्रवादीच्या वाटेवर; निवडक कार्यकर्त्यांसह सोमवारी पक्षप्रवेश

लोकशाही Democracy जिवंत ठेवण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांची secular parties ताकद वाढण्याची गरज असून गोरगरिबांसाठी झटणार्‍या पक्षांना शक्ती देण्याचा विचार पक्ष संघटनांनी करावा, असे आवाहन लक्ष्मण माने Laxman Mane यांनी केले आहे.
Laxman Mane
Laxman Manesarkarnama

सातारा : देशात लोकशाही संस्थांची गळचेपी करुन हिटलरशाही आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. या कठीण काळात सर्व लोकशाहीवाद्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमुल काँग्रेस अशा पक्षांना शक्ती देणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील निवडक कार्यकर्त्यांसह सोमवारी (ता. १८) मुंबई येथे राष्ट्रवादी कार्यालयात दुपारी बारा वाजता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा आज पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत केली.

लक्ष्मण माने म्हणाले, देशाची राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. देशात आगामी काळात लोकशाही जिवंत राहतेय की नाही, अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. यंत्रणांचा वापर करुन पक्ष, संघटना संपवण्याचे काम होत आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांची ताकद वाढण्याची गरज असून सर्व धर्म समभाव याप्रमाणे गोरगरिबांसाठी झटणार्‍या पक्षांना शक्ती देण्याचा विचार पक्ष संघटनांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Laxman Mane
हिंदू हा शब्द गुलामीचे प्रतीक, आताच झुगारा : लक्ष्मण माने

दरम्यान, भारतीय स्वातंत्र्याला ५० वर्षे होत असून राजर्षी शाहू महाराजांची स्मृती शताब्दी आहे. याचे औचित्य साधून ३१ ऑगस्ट रोजी भटक्या विमुक्त संघटनेचे अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. त्यावेळी अध्यक्षस्थानी कवी डॉ. यशवंत मनोहर उपस्थित राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख पाहुणे असणार आहेत.

Laxman Mane
राजू शेट्टींचा पाया उखडलाय? : लोकसभेची पुढील लढत खासदार माने विरुद्ध आवाडे...

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात हजारो भिमसैनिक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या अधिवेशनात परिवर्तनवादी समाज संघटनांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेने अध्यक्ष लक्ष्मण माने व सरचिटणीस नारायण जावलीकर यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in