Laxman Dhoble On Rajan Patil : राष्ट्रवादी सोडल्यानंतर ढोबळेंनी प्रथमच केले राजन पाटलांचे कौतुक : म्हणाले, ‘वाकड्या नजरेने कधी...’

राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर ढोबळे यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर प्रथमच राजन पाटील यांचे ढोबळे यांनी कौतुक केले आहे.
Laxman Dhoble-Rajan Patil
Laxman Dhoble-Rajan PatilSarkarnama

मंगळवेढा (जि. सोलापूर) : मोहोळमधल्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत मी जरा जास्तच बोललो, त्याची चर्चा तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाली. मात्र, पाना- फुलाने भरलेल्या या शिक्षण क्षेत्रात बिचाऱ्याने वाकड्या नजरेने कधी पाहिले नाही, हे त्यांच्या नीतीचे लक्षण असून ३० वर्षात शाळेला कोणताही त्रास दिला नाही, अशी जाहीर कबुली माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhoble) यांनी माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांचे नाव न घेता दिली. (Laxman Dhoble praised Former Mla Rajan Patil....)

मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी येथील शारदा महाविद्यालयातील कार्यक्रमात ढोबळे बोलत होते. त्यावेळी त्यांनी माजी आमदार पाटील यांचे कौतुक केले. ढोबळे हे मंगळवेढा-मोहोळ मतदारसंघाचे २० वर्षे, तर पाच वर्षे मोहोळ मतदारसंघाचे आमदार होते. राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर ढोबळे यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर प्रथमच राजन पाटील यांचे ढोबळे यांनी कौतुक केले आहे.

Laxman Dhoble-Rajan Patil
Shinde Group News : आदित्य ठाकरेंच्या गडाला सुरुंग; वरळीतून शिवसेनेचा पहिला नगरसेवक शिंदे गटात सामील

माजी मंत्री ढोबळे म्हणाले की, शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा नेताना संस्थेचा विस्तार झाला. शिक्षणाचे आरोग्य चांगलं राहावं, यासाठी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनीही जीवाचे रान केले. सत्तेची चव वेगळी असते. सत्ता गेल्यावर माणसाची अवस्था फार बिकट होते. मात्र मी या संस्थेच्या संसारात रमून गेलो. माजलेल्या मस्तवालांना आवर घालण्याची ताकद माझ्या मुलीच्या काळ्या कोटात आहे, हेच माझं वैभव आहे आणि त्याच वैभवासाठी कुठल्याही पुढाऱ्याकडे जाऊन मला एखादं महामंडळ द्या, असं म्हणावं लागलं नाही.

Laxman Dhoble-Rajan Patil
Konkan News : कोकणात ठाकरे गटाची पडझड थांबेना; हजारो शिवसैनिक शिवबंधन तोडून भाजपात जाणार

पत्नीचा आधार तुटल्यामुळे तीन मुलांना ताकद देणे, ही माझी जबाबदारी असून माझी अवस्था बशी नसलेल्या कपासारखी झाली आहे. या साऱ्या प्रश्नाचे उत्तर मला संस्थेत शिकणाऱ्या मुलांमध्ये दिसत आहे. माजी मंत्री असल्यामुळे कपाटात तुडुंब सोनं मोजायची सवय असायला हवी. मात्र, मी सोन्यासारखी माणसं जपली आहेत, असे ही ढोबळे यांनी स्पष्ट केले.

Laxman Dhoble-Rajan Patil
Rajendra Raut News : सरकारला ‘पै न्‌ पै’चा हिशेब देऊ; पण माझ्याशी वाईट वागणाऱ्यांना धडा शिकवू : राऊतांचा इशारा

या वेळी माजी आमदार दत्तात्रेय सावंत, सुभाष माने, बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. कोमल ढोबळे-साळुंखे, भीमराव जरग, समाधान शेळके, राजकुमार पाटील, सुधीर गायकवाड, रामचंद्र शेळके, सुभाष पाटील, प्राचार्य चिदानंद माळी आदी उपस्थित होते. माजी आमदार सावंत, ॲड ढोबळे-साळुंखे, सुभाष माने व विद्यार्थ्यांची भाषणे झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com