Laxman Dhobale: ''..यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही..''; लक्ष्मण ढोबळेंची मोठी घोषणा!

Laxman Dhobale: आता माझं वय झालं असून मला...
Laxman Dhobale, BJP news
Laxman Dhobale, BJP newsSarkarnama

हुकूम मुलाणी

Laxman Dhobale News : आता पाच सहा वर्षे भाजपात काढली असून पक्षात ज्येष्ठता आहे. तालुक्यात माझी जरा अडचण होते. मात्र, वरिष्ठ स्तरावर मला पुढारी समजण्यापेक्षा वर्गशिक्षक समजून मान देतात. पण आता माझं वय झालं असून मला आता आधाराची गरज आहे. म्हणून आता माणूस सोबत लागतो. त्यासाठी आप्पा आणि बापू हे दोघे पुरेसे आहेत. आगामी काळात कोणतीही निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळें(Laxman Dhobale)नी केली आहे.

मंगळवेढा शहर विकास आराखड्यात बाधित झालेल्या लोकांच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी उपविभागीय कार्यालयासमोर मार्गदर्शन करताना माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे बोलत होते.

Laxman Dhobale, BJP news
Eknath Shinde: गुलाबराव पाटील गुवाहाटीला कसे पोहचले? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

ढोबळे म्हणाले, पक्ष माझा मी पक्षाचा असल्यामुळे ते माझा शब्द खाली पडू देणार नाही. शेडजींनी घराघरात जाऊन हात जोडून मत मागत मला आमदार केलं. त्यांना दिलेलं वचन मी शेवटपर्यंत पार पाडेन. ज्या मागासवर्गीय जातीतून आलोय त्या जातीला गिधाड मेलेलं सगळ्यात आधी कळतं.

प्रांत कार्यालयासमोर जबाबदारीने बोलताना वकुब नसलेला अधिकारी तालुक्यात मोठ्या पदावर बसल्यामुळे नुकसान झाले. ज्या आवाक्याने,विस्ताराने, आणि खोलात जाऊन बघायला हवं होतं ते पाहिलं नाही. नुसत्या काखावर केल्या. प्रशासक म्हणून त्यांनी जी जबाबदारी पार पाडायला हवी ती पार पाडली नाही.तो दोष इतरांना सोसावा लागतो.त्यामुळे जे तुमच्या हातून झाले आहे ते तुम्हीच मिटवा अशा शब्दात उपविभागीय अधिकाऱ्यावर प्रहार केला.

Laxman Dhobale, BJP news
Julio Ribeiro News : फडणवीस,संशयाचे धुके लवकर हटवा ; माजी पोलिस अधिकाऱ्यांचा सल्ला

शहर विकास आराखड्यात कुणालाही विश्वासात घेतले नाही त्यामुळे कोणावर आरोप न करता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुरुवातीच्या काळात काहीच कळत नाही म्हणत होते. परंतू, तेच किती सक्षम आहेत हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या माध्यमातून हा आराखडा रद्द करून शहरवासीयांचे होणारे नुकसान टाळूया असेही ढोबळे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in