‘शिवसेनेचा मुख्यमंत्री, आम्ही मंत्री असूनही सांगलीच्या युवा सेना पदाधिकाऱ्याला वाचवू शकलो नाही’

गेल्या अडीच वर्षांत शिवसैनिकांचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण करण्यात आले. शिवसैनिकांवर अनेक खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

पंढरपूर : गेल्या अडीच वर्षांत शिवसैनिकांचे (Shiv Sainik) मोठ्या प्रमाणात खच्चीकरण करण्यात आले. शिवसैनिकांवर अनेक खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या. काहींना तडीपाऱ्या भोगाव्या लागल्या. दोन ते तीन लोकांवर तर मोकासारखी कारवाई झाली. त्यात सांगलीचे (Sangli) युवा सेनेचे सचिन कोळेकर याचा समावेश आहे. जिल्हा प्रमुख, तालुकाप्रमुख हे ओक्साबोक्शी रडत होते. शिवसेनेचे (Shivsena) मुख्यमंत्री आणि आम्ही मंत्री असूनही त्याला वाचवू शकलो नाही, हे दुर्भाग्य आहे, अशा शब्दांत महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसैनिकांवर झालेल्या कारवाईबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी खंत व्यक्त केली. (Last two and a half years, many false cases filed against Shiv Sainiks : Eknath Shinde)

आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपुरात आले होते. महापूजेनंतर टाकळी या ठिकाणी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळावा घेण्यात आला. त्यात शिंदे बोलत होते.

Eknath Shinde
ठाकरे सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंनी तीन हजार कोटी घेतले : माजी जिल्हाप्रमुखांचा खळबळजनक आरोप

ते म्हणाले की, अत्यंत जड अंतःकरणाने, छातीवर दगड ठेवून हा निर्णय घेतला आहे. आता रस्त्यावर स्वागतासाठी उभारलेले लोक पाहून हा निर्णय योग्य होता, हे लक्षात येते. अनेक जिल्हाप्रमुख माझ्याकडे येऊन म्हणायचे ‘आम्हाला मेळाव्याला बोलवतात. पण आमची परिस्थिती काय आहे, याचा विचार कोणीही करत नाही.’ गेल्या अडीच वर्षात अनेक शिवसैनिकांवर अन्याय झाला. अनेक जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख ओक्साबोक्शी रडत होते. पण, आता तसं होणार नाही. एकाही शिवसैनिकावर अन्याय होऊ देणार नाही. त्यांचे खच्चीकरण होऊ देणार नाही. सामान्य शिवसैनिकांना सत्तेचा फायदा कसा होईल, याकडेच लक्ष देण्यात येईल.

Eknath Shinde
तानाजी सावंतांचा २४ तासांत ठाकरेंना झटका; सोलापूर शिवसेनेचा मोठा गट शिंदेंच्या गोटात!

मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. आम्ही घेतलेली हिंदुत्वाची भूमिका लोकांनी मानली आहे. सर्वसामान्यांना न्याय देणे म्हणजेच हिंदुत्व. माझ्यावर विश्वास ठेवा, मी राज्याचा मुख्यमंत्री असलो तरी जनतेचा सेवक म्हणूनच काम करेन. माझ्यातील कार्यकर्ता कधीही मरू देणार नाही. तुम्हाला जेव्हा जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा तेव्हा मंत्रालयातील मुख्यमंत्री दालन तुमच्यासाठी खुले असेल. सर्वसामान्य माणूस मुख्यमंत्रिपदावर बसल्याची भावना जनतेमध्ये आहे. पण, काही लोकांना मुख्यमंत्रीपद हे मक्तेदारी वाटतं. सर्वसामान्य माणूस मुख्यमंत्रीपदावर बसला, याचा अभिमान वाटला पाहिजे होता. मात्र तसं होत नाही, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Eknath Shinde
अनिल परबांनी माझ्याविरोधात राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला बळ दिलं : बंडखोर योगेश कदमांचा घाणाघात

पंढरपूरचा विशेष आराखाडा बनविणार

पंढरपूरचा विशेष आराखाडा बनविण्यात येणार आहे. तिरुपती बालाजी, काशिविश्वेश्वराच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी सर्वकाही करण्याची सरकारची तयारी आहे. सर्व महापुरुषांची स्मृतीस्थळे उभारण्यात येतील. नगरपालिकेने त्याचा आराखडा तयार करून पाठवावा, त्याला लागेल तेवढा निधी देण्याचे काम शंभर टक्के करण्यात येईल. चंद्रभागा घाटाचे सुशोभीकरणही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com