पिचडांनी उडविला लहामटेंचा धुव्वा

या निवडणुकीत भाजपचे मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) समर्थक विरुद्ध राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे ( Kiran Lahamte ) समर्थक यांच्यात लढत होती.
Vaibhav Pichad Vs Dr. Kiran Lahamte
Vaibhav Pichad Vs Dr. Kiran LahamteSarkarnama

अकोले ( जि. अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यातील तीन नगर पंचायतींसाठी आज मतमोजणी प्रक्रिया सुरू होत आहे. यात अकोले नगर पंचायतचा समावेश आहे. ही निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. या निवडणुकीत भाजपचे मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) समर्थक विरुद्ध राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे ( Kiran Lahamte ) समर्थक यांच्यात लढत होती. अकोले नगर पंचायत भाजपच्या ताब्यात आहे. या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीचा धुव्वा उडवित सत्ता राखली. Lahamaten's wash was blown away by Pichad

Vaibhav Pichad Vs Dr. Kiran Lahamte
शरद पवार, मधुकर पिचड, गावित असे नेते चौदा किलोमीटर चालत त्या गावात पोहोचले होते..

अकोले नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारात विकासापेक्षा आरोप प्रत्यारोप होत राहिले. महाविकास आघाडीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रपणे तर काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढली. यात काँग्रेसच्या मधुकर नवले यांनी भाजपपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसलाच लक्ष्य केले. त्यामुळे भाजपला अधिक बळ मिळत गेले.

दोन टप्प्यात झालेल्या मतदानानंतर आज सकाळी मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. अवघ्या दीड तासात मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. यात भाजपचे 12, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2, शिवसेनेचा 1 तर काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी झाला. त्यामुळे पिचड पिता-पुत्रांनी आपली सत्ता पुन्हा राखण्यात यश मिळविले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com