Koregaon APMC News : मी आणि शशिकांत शिंदेंनी उत्तरे द्यायची; बाकीच्यांनी निवांत राहायचे : रामराजे संतापले

Ramraje Naik Nimbalkar कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्य निवडणुकीसाठी महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचारानिमित्त कोरेगाव येथे आयोजित सभेत रामराजे बोलत होते.
Ramraje Naik Nimbalkar, Shashikant Shinde
Ramraje Naik Nimbalkar, Shashikant Shindesarkarnama

-राजेंद्र वाघ

Koregaon APMC Election : राजकारण हा सध्या खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्याने ढासळलेल्या राजकीय संस्कृतीची पुन:स्थापना करण्यासाठी आणि २०१९ मध्ये जे बिघडले आहे, ते सुधारण्यासाठी वैचारिक मतांची एकजूट करावी लागणार असून, सूडाच्या राजकारणातून कार्यकर्त्यांची जिरवण्याच्या संस्कृतीला थांबवण्याची जबाबदारी आता मतदारांवर आहे. त्यामुळे कोरेगाव Koregaon APMC बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी Mahavikas Aghadi पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar यांनी केले.

कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्य निवडणुकीसाठी महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचारानिमित्त कोरेगाव येथे आयोजित सभेत रामराजे बोलत होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब सोळसकर, अॅड. विजयराव कणसे, शिवाजीराव महाडिक, सुनील माने, किशोर बाचल, संजय झंवर, रामभाऊ लेंभे, राजेंद्र शेलार, राजाभाऊ जगदाळे, उपस्थित होते.

वैयक्तिक द्वेष किती करायचा? असा प्रश्न उपस्थित करून रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, "कोरेगावची एक वैचारिक पातळी, राजकीय संस्कृती आहे. हे वैभव तुम्ही गमावून बसलेले आहात. विकले जाणारे राजकारण नको आहे. त्यामुळे मतदार म्हणून तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत. अन्यथा या जिल्ह्याचे बिघडलेले वळण कधीही सरळ होणार नाही."

Ramraje Naik Nimbalkar, Shashikant Shinde
Phaltan : सत्तांतराची स्वप्ने बघू नका; इथं राज्य फक्त फलटणच्या श्रीरामाचेच : रामराजे

या जिल्ह्यामध्ये मी व शशिकांत शिंदे, आम्ही दोघांनीच उत्तरे द्यायची आणि बाकीच्यांनी निवांत राहायचे, असे किती दिवस चालणार? असा परखड सवाल श्री. निंबाळकर यांनी यावेळी उपस्थित केला. शशिकांत शिंदे म्हणाले, "कोरेगाव मतदारसंघात महाविकास आघाडी भक्कम करण्याच्या दृष्टीने बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवार दिले आहेत.

Ramraje Naik Nimbalkar, Shashikant Shinde
Koregaon News : अखंड भारत तोडण्याचे षडयंत्र हाणून पाडूया : शशिकांत शिंदे

ॲड. विजयराव कणसे व मी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढलो आहे. पण आम्ही कधीही द्वेषाचे राजकारण केले नाही. विद्यमान लोकप्रतिनिधी मात्र प्रति मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. छोट्या छोट्या गोष्टींवरून लोकांना नाहक त्रास दिला जात आहे. काल तर त्यांनी पालकमंत्र्यांसमोरच अधिकाऱ्यांना धमकी दिली. आपली एकत्रित ताकद विरोधकांना नेस्तनाबूत करेल, असा संदेश या निवडणुकीच्या माध्यमातून आपण देऊयात.

Ramraje Naik Nimbalkar, Shashikant Shinde
शेतात रमले मुख्यमंत्री Eknath Shinde, बघा व्हिडीओ । Satara | Sarkarnama video

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com