दिल्लीतून फोन येताच अमल महाडिकांची माघार अन् सतेज पाटील बिनविरोध

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 6 जागा बिनविरोध करण्यासाठी धावाधाव सुरु होती. यात कोल्हापूरच्या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
Satej Patil and Amal Mahadik
Satej Patil and Amal Mahadik Sarkarnama

कोल्हापूर : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या (Legislative Assembly) 6 जागा बिनविरोध करण्यासाठी धावाधाव सुरु होती. यात कोल्हापूरच्या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. राज्यातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचे आदेश दिल्लीतून आल्यानंतर आज तात्काळ भाजप (BJP) आघाडीचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी माघार घेतली आहे. यामुळे काँग्रेस नेते व पालकमंत्री सतेज पाटील (Satel Patil) हे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुका बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर काही वेळातच अमित शहांनी धनंजय महाडिक यांना फोन करून अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना केली. यानंतर महादेवराव महाडिक यांच्याशी चर्चा झाल्यानंतर अर्ज मागे घेण्याचे निश्चित करण्यात आले.

Satej Patil and Amal Mahadik
परमबीरसिंहांना दणका! आरोप करून ऐनवेळी माघार घेणं पडलं महागात

भाजपने संजय केनेकर यांचा अर्ज माघारी घेवून काँग्रेसच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांची पोटनिवडणूक बिनविरोध केली. त्यानंतर काँग्रेसनेही मुंबईतील अपक्ष संजय कोपरकर यांचा अर्ज माघारी घेत मुंबईच्या दोन जागा बिनविरोध केल्या. त्यामुळे आता उर्वरित 4 जागांवर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यात कोल्हापूरच्या हायव्होल्टेज जागेचाही समावेश आहे. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने आज संध्याकाळपर्यंत याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. अखेर महाडिक यांनी माघार घेतल्याने सतेज पाटलांचा मार्ग मोकळा झाला.

Satej Patil and Amal Mahadik
काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी भंगारवाला अन् त्याची संपत्ती 1 हजार 744 कोटींची!

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसकडून भाजपला प्रस्ताव गेल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन या प्रस्तावावर सविस्तर चर्चा केली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातही बैठका सुरू होत्या. या प्रस्तावानुसार भाजपला 2 जागा, प्रज्ञा सातव यांच्यासह काँग्रेसला 2 आणि शिवसेनेला 2 जागा असे सूत्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com