Kolhe : काश्मीर फाईल, हनुमान चालीसा, भोंग्यांनी महागाई, बेरोजगारीचे संकट टळेल ?

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज मंदिरांचे कळस आणि देव्हाऱ्यातले देव शाबूत आहेत, त्या महाराष्ट्राला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. (Dr. Amol Kolhe)
Dr. Amol Kolhe
Dr. Amol KolheSarkarnama

कोल्हापूर : आमचे नेते शरद पवार यांनी संकल्प सभेसाठी कोल्हापूरची निवड केली, कारण नुकत्याच झालेल्या उत्तर कोल्हापूर (Kolhapur) विधानसभेच्या पोटनिवडणूकीत येथील जनतेने दाखवून दिले की, हा महाराष्ट्र कधीही विखारी प्रचार व देश तोडण्याच्या गोष्टीला कधीही थारा देत नाही. कोल्हापूरकरांचे ठरलेले असते `खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी`, अशा शब्दात खासदार डाॅ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी कोल्हापूरकरांचे आभार मानले.

कोल्हापूर येथील राष्ट्रवादीच्या संकल्प सभेत बोलतांना कोल्हे यांनी देशात व राज्यात सध्या सुरू असलेल्या विखारी राजकारणावर सडकून टीका केली. कश्मीर फाईल, हनुमान चालीसा आणि भोंग्यांनी महागाई, बेरोजगारीचे संकट दूर होणार आहे का? असा सवाल देखील कोल्हे यांनी यावेळी केला. (Maharashtra)

कोल्हे म्हणाले, कधी काळी निवडणूक हे माध्यम, सत्ता हे साधन आणि रयतेचे हित हे साध्य होते. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. निवडणूक माध्यम राहिलं नाही आणि निवडणुकीतून सत्ता हे साध्य झालं आहे. प्रतिक्रेयाला प्रतिक्रियेनेच उत्तर असा प्रकार सध्या सर्वत्र सुरू आहे. मिडियावाले देखील यावरच काम करत आहेत.

प्रतिक्रियावादी राजकारण सुरू असल्याने क्रियाशील राजकारण आणि शास्वत विकासाचे राजकारण मागे पडत चालले आहे. महागाई, बेरोजगारी सारख्या मु्द्यावरून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी हिंदुत्व, हनुमान चालीसा, भोंग्यासारखे विषय काढूले जात आहेत. आजच्या तरूण पिढीला माझा सवाल आहे, कश्मीर फाईल चित्रपटाचे तिकीट हातात पडल्यावर तुमच्या बेरोजगारीचे संकट टळणार आहे का ? हनुमान चालीसा, भोंग्याच्या प्रश्न महागाईचे संकट दूर करेल का ?

Dr. Amol Kolhe
Khadse : राष्ट्रवादी काॅंग्रेस एक नंबरचा पक्ष आणि २०२४ मध्ये आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे..

त्यामुळे अशा विखारी, देश तोडू पाहणाऱ्या प्रचाराला बळी पडू नका. हिंदुत्व, हिंदू असल्याचा आम्हालाही अभिमान आहे. जय श्रीराम म्हटल्याने आमचेही ऊर भूरुन येते. त्यामुळे आम्हाला हिंदुत्व शिकवण्याच्या कुणी भानगडीत पडू नये. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज मंदिरांचे कळस आणि देव्हाऱ्यातले देव शाबूत आहेत, त्या महाराष्ट्राला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, असेही कोल्हे यांनी विरोधकांना सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in