Kolhapuri paytan : आव्हाड-मुश्रीफांमुळे चर्चेत आलेल्या कोल्हापुरी पायताणाचा कोणी कोणाला दाखवला हिसका?

NCP Leader ColdWar : मुश्रीफ-आव्हाड यांच्यात रंगलेली पायताणाची भाषा राजकीय मूल्यांना धरून नसली तरी याआधी त्याचा अनेकदा उल्लेख झालेला आहे.
Jitendra Awhad-Hasan Mushrif
Jitendra Awhad-Hasan MushrifSarkarnama

Kolhapur News : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कोल्हापूरच्या सभेत बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘राष्ट्रवादीतील गद्दारांना कोल्हापुरी पायताण दाखवा,’ असं वक्तव्य केले होते. त्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘करकरीत कापशीचं कोल्हापुरी पायताण बसलं की कळलं,’ असं उत्तर दिलं होतं. या दोघांच्या जुगलबंदीनंतर कोल्हापुरी पायताणाची राज्यभरात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. यापूर्वीही अनेकांनी राजकारणात एकमेकांना कोल्हापुरी पायताण उगारल्याचे दिसून येते. आतापर्यंत असे अनेक किस्से आहेत, ज्यामध्ये कोल्हापुरी पायताणाचा उल्लेख रांगड्या पद्धतीनेच करण्यात आलेला आहे. (Kolhapuri Chappal is in discussion again due to Awhad-Mushrif)

कोल्हापूरच्या रांगड्या भाषेत एखाद्याचा उद्धार करण्यासाठी दिवसातून कितीतरी वेळा कोल्हापुरी पायताणाचा उल्लेख होतो. हसन मुश्रीफ-जितेंद्र आव्हाड यांच्यात रंगलेली पायताणाची भाषा राजकीय मूल्यांना धरून नसली तरी याआधी त्याचा अनेकदा उल्लेख झालेला आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ‘कोल्हापुरी पायताण जगप्रसिद्ध आहे. राज्यपालांना ते पायताण दाखवलं पाहिजं,’ असे वक्तव्य केले होते.

Jitendra Awhad-Hasan Mushrif
Shahaji Patil News : ‘शहाजीबापू, आता निधी नको, पाणी द्या'; टंचाईच्या परिस्थितीने सांगोल्यातील शेतकरी खवळला

महावितरणच्या विरोधात २१ नोव्हेंबर रोजी कोल्हापूरकरांनी मिरजकर-तिकटी येथे भव्य पोस्टर लावला होता. त्यावेळी घरगुती वीजबिल न भरण्याचा पवित्रा कृती समितीने घेतला होता. कोरोना काळातील सहा महिन्यांचे वीजबिल मागणाऱ्या सरकारला, वीजजोड तोडणाऱ्याला, जनतेवर जबरदस्ती करणाऱ्याला, खणखणीत झटका अस्सल कोल्हापुरी तेल लावलेले पायताण बसेल, असा आशयही फलकावर झळकला होता.

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. त्यांनी राज्याचे नेतृत्त्व केलं, पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्यांचा निषेध म्हणून २५ जून २०२० रोजी पडळकर यांच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्रात पायताण मारो आंदोलन करण्यात आले होते.

Jitendra Awhad-Hasan Mushrif
Pratibhatai Pawar News : प्रतिभा पवारांनी ४४ वर्षांत प्रथमच घेतले वळसे पाटलांशिवाय भीमाशंकरचे दर्शन...

एसटी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची चर्चा राज्यभरात सुरू झाली. पण, त्याच वेळी मराठा आरक्षणाला विरोध केल्यानंतर ८ ऑक्टोंबर २०२० रोजी कोल्हापुरात त्यांच्या प्रतिमाला पायताण मारो आंदोलन करण्यात आले होते.

कोल्हापुरी पायताणावर न्यायालयाची टिपण्णी

बीड जिल्ह्यातील मस्साजोगमधील ही घटना आहे. मंगेश देशमुख आणि श्रद्धा देशमुख हे दोघे पती-पत्नी होते. नातेवाईकांशी वाद झाल्यानंतर त्यांनी कोल्हापुरी चपलेने अनंत देशमुख यांना मारहाण केली होती. त्यानंतर अनंत देशमुख यांनी पोलिसांकडे धाव घेतली. मारहाण करणाऱ्या मंगेश आणि श्रद्धा यांच्यावर कोल्हापुरी चप्पलने मारल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. अनंत देशमुख यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर आरोपमुक्त करताना न्यायालयाने कोल्हापुरी चप्पलेला ‘जीवघेणे हत्यार’ नाही, असा स्पष्ट निर्वाळा दिला होता.

Jitendra Awhad-Hasan Mushrif
Tirupati Devsthan : तिरुपती देवस्थानच्या विश्वस्तपदी ठाकरे-फडणवीसांचे विश्वासू सहकारी; नार्वेकरांच्या नावामुळे आश्चर्य

एकंदरीतच मागील दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत राजकारणात पायातील वाहणा असणाऱ्या कोल्हापुरी चप्पल चांगलीच चर्चेत आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in