Kolhapur : ते तर आमचे नेते; राजेश क्षीरसागरांनी केले चंद्रकांत पाटलांचे कौतूक....

मी एकनाथ शिंदे eknath Shinde यांच्या गटात जाऊन त्यांना पाठिंबा दिला Supported ही कोणतीही बंडखोरी not Rebellion नाही.
Rajesh Kshrisagar, Chandrakant Patil
Rajesh Kshrisagar, Chandrakant Patilsarkarnama

कोल्हापूर : राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू नसतो, त्यांचा आणि आमचा व्यवसाय नाही, बांधाला बांध नाही. चंद्रकांत पाटील हे आमचे नेते असून ते जिल्ह्याचे नव्हेत तर ते राज्याचे नेते आहेत, अशा शब्दत राजेश क्षीरसागर यांनी चंद्रकांत पाटलांचे कौतूक केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरांच्या गटात सामील झालेले कोल्हापुरातील माजी आमदार आणि राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर कोल्हापूरत परतले.यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी शिंदे गटाबाबत जाण्याची मागची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांचे तोंडभरून कौतूक केले.

Rajesh Kshrisagar, Chandrakant Patil
Eknath Shinde: एकनाथ शिंदे गटाचे आमदार चार दिवसातच गटबाजीने अस्वस्थ?

यावेळी राजेश क्षीरसागर म्हणाले, आम्ही जेव्हा गुवाहाटीला गेलो, तेव्हा प्रथमदर्शनी आमच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, विश्वासदर्शक ठराव पास झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सभागृहात भाषण केले, त्यानंतर सर्व शिवसैनिकांच्या मनातील गैरसमज दूर झाला आहे. मी एकनाथ शिंदे यांच्या गटात जाऊन त्यांना पाठिंबा दिला हा कोणताही बंडखोरी नाही.

Rajesh Kshrisagar, Chandrakant Patil
राजेश क्षीरसागर, रवींद्र फाटक यांना मिळणार आमदारकीचं बक्षीस?

चंद्रकांत पाटलांविषयी बोलताना ते म्हणाले, राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू नसतो, त्यांचा आणि आमचा व्यवसाय नाही, बांधाला बांध नाही, देशातील अनेक राजकीय नेते एकत्र आले आहेत. त्यामुळे मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. चंद्रकांत पाटील आमचे नेते आहेत. ते जिल्ह्याचे नेतेच नाहीत, तर राज्याचे नेते असल्याचे क्षीरसागर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in