कोल्हापूरात शिवसेनेची ‘टॉप टू बॉटम’ यंत्रणा कामाला; गड बांधणीसाठी ठाकरे-राऊत जिल्ह्यात

Kolhapur | Shivsena : कोल्हापूरचे सत्ताकेंद्र शिवसेनेभोवती ठेवण्याचा निर्धार
Sanjay Raut, Aditya Thackeray
Sanjay Raut, Aditya ThackeraySarkarnama

(Shivsena kolhapur latetst news)

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) उत्तरची जागा दोन वर्षांत दोनवेळा काँग्रेससाठी (Congress) गेल्यानंतर आता शहरातील शिवसेना (Shivsena) पुन्हा एकदा आपल्या गडाची बांधणी करुन तो काबीज करण्यासाठी कामाला लागल्याचे चित्र आहे. सोबत आगामी काळातील कोल्हापूर महानगरपालिकेसह जिल्हातील सर्व नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीही शिवसेनेने शड्डू ठोकला आहे.

याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बुस्ट देण्यासाठी १५ आणि १६ मे रोजी पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे (Aditya Thackeray) तर २६, २७ आणि २८ मे रोजी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आदित्य ठाकरे कोल्हापुरात कोणताही कार्यक्रम घेणार नसले तरीही इचलकरंजी, शाहूवाडी अशा भागात येवून ते जिल्हा ढवळून टाकणार असल्याचे समजते. या सर्व निवडणुकांमध्ये आघाडी झाली किंवा झाली नाही तरीही सत्ताकेंद्र शिवसेनेच्या भोवतीत निर्माण करण्याचा विडाच आता शिवसेनेच्या ‘टॉप टू बॉटम’ नेत्यांनी आणि कार्यकत्यांनी उचलला असल्याचे या पंधरा दिवसांतील स्थितीवरून दिसून येते.

Sanjay Raut, Aditya Thackeray
ओवेसी बोकडांनी महाराष्ट्रात येऊन बडबड करू नये; ओवेसींच्या टीकेला मनसेकडून प्रत्युत्तर

दरम्यान, कोल्हापुरातील उत्तर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीपूर्वी शिवसेनेतील उफाळलेली अंतर्गत बंडाळी मिटवून घेण्यात आली असून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार आणि ‘उत्तर’चे माजी आमदार, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे सूत पुन्हा एकदा जुळले आहे. एकाच पक्षातील दोन-तीन गट विसर्जित करून शिवसेनेने एक मुठ बांधली आहे. ज्यांच्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होऊ शकते, अशा पदाधिकाऱ्यांना बाजूला ठेवण्यात आले असून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

आठवड्यापूर्वीच संपर्क नेते अरुण दुधवडकर यांनीही शासकीय विश्रामगृहावर पादाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मंत्री अदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचा संदर्भ असला तरीही त्यातून कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यात आले आहे. यानंतर तालुका पातळीवर प्रमुखांच्या नियुक्ती झाल्या आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी देखील कोल्हापुरात दोन दिवस थांबून महापुरासह अन्य बैठका घेतल्या. शिवसेनेचे अस्तित्व दाखविण्याचे काम आता सुरू झाले असल्याचा संदेश कळत न कळत यातून देण्यात आला. शिवसेनेचा महापौर असेल असे राजेश क्षीरसागर हे सुद्धा वारंवार माध्यमांसमोर बोलून दाखवित आहेत.

Sanjay Raut, Aditya Thackeray
उद्धव ठाकरेंच्या सभेचं मला निमंत्रण; पण मी जाणार नाही : रामदास कदम

एकूणच त्यामुळे शिवसेनेत ‘टॉप टू बॉटम’ यंत्रणा कामाला लागल्याचे यातून दिसून येते आहे. कोल्हापूर महानगर पालिकेत सध्या शिवसेनेला परिवहन सभापतीचे पद आहे. मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. आता नव्या बहुसदस्यीय प्रभाग समितीच्या रचनेतून किमान पंधराहून अधिक जागांवर शिवसेना विजयी होईल, अशी आखणी सुरू झाली आहे. कोणत्याच पक्षाला एकहाती सत्ता मिळणार नसल्याचे राजकरणी सुद्धा जाणतात. त्यामुळे सर्वच जागा लढवून शक्ती वाजा जाण्यापेक्षा मोजक्याच जागा लढवून विजय खेचून आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com