कोल्हापूरचा प्रवास पुन्हा बदलापूरकडे : धनंजय महाडिक जुने सगळे हिशोब चुकते करणार?

Rajya Sabha Election | Dhananjay Mahadik | Satej Patil : ८ वर्षांच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर धनंजय महाडिक यांनी गुलाल उधळला
Dhananjay Mahadik - Satej Patil
Dhananjay Mahadik - Satej Patil Sarkarnama

मुंबई : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या राज्यसभा निवडणुकीत (RaJyasabha Election) भाजपचे (BJP) पियुष गोयल (Piyush Goyal), अनिल बोंडे (Anil Bonde) आणि धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) हे तिन्ही उमेदवार विजयी ठरले आहेत. महाविकास आघाडीची तब्बल ११ मत फोडतं भाजपने तिसरी आणि महाडिक यांनी धोक्याची जागा जिंकली आहे. त्यामुळे तब्बल ८ वर्षांनंतर महाडिक कुटुंबियांनी गुलाल उधळला आहे.

दरम्यान महाडिक यांच्या या विजयानंतर कोल्हापूरमधील राजकारण बदलणार हे निश्चित आहे. खासदार धनंजय महाडिक जुने सगळे हिशोब चुकते करणार असल्याचे बोलले जात आहे. मागील सात ते आठ वर्षांपासून काँग्रेसचे नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी शिवसेनेला हाताशी धरत कोल्हापूरमधील महाडिकांचे वर्चस्व मोडीत काढत आणले होते. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत तरी महाडिकांना विजय मिळणार का, याची उत्सुकता होती.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक राष्ट्रवादीकडून खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक यांनी अवघ्या १५ दिवस आधी भाजपकडून उमेदवारी घेत सतेज पाटील यांचा पराभव केला. हा पाटील यांच्यासाठी मोठा धक्का ठरला होता. महाडिक गटाची तेव्हा सरशी होत होती. महादेवराव महाडिक म्हणतील तोच शब्द कोल्हापूरात खरा होत होता. गोकुळ संस्था, जिल्हा बॅंक, महापालिका, जिल्हा परिषद येथे त्यांच्याच गटाचे प्राबाल्य होते.

या पराभवानंतर सतेज पाटील यांनी महाडिकांकडून सारी राजकीय संस्थाने जिंकून घेतली. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी महाडिक यांना प्रथम रोखले. पालिकेत शिवसेनेच्या मदतीने काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आली. त्यानंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महादेवराव महाडिक यांचा पराभव करत दुसरा धक्का दिला. या धक्क्यानंतर महाडिक गटाच्या ताकदिला ओहोटी लागली. जिल्हा परिषदेवरही सतेज पाटील यांनी काँग्रेसचा झेंडा फडकवला.

महाडिकांच्या सत्तेला आणखी एक हादरा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बसला. सतेज पाटील यांनी शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना पाठिंबा देत धनंजय महाडिक यांचा पराभव केला. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर गोकुळच्या निवडणुकीत महाडिकांची तेथील सत्ता संपुष्टात आणली. जिल्हा बॅंकेतही पाटील-मुश्रीफ जोडीचा बोलबाला राहिला.

पाटील हे एकेक सत्तास्थाने ताब्यात घेत असतानाच २०२१ साली पुन्हा विधान परिषद निवडणूक आली. या निवडणुकीत महाडिक विरुद्ध पाटील असा सामाना होण्याची शक्यता निर्माण झाली. भाजपने अमल महाडिक यांना उमेदवारीही जाहीर केली. पण काही घडामोडींमुळे अमल महाडिक यांनी माघार घेतली. त्यामुळे तेथेही पाटील यांनीच गुलाल उधळला. नुकत्याच झालेल्या उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत महादेवराव महाडिक यांचे भाचे सत्यजित कदम यांचा पराभव झाला. त्यामुळे महाडिक यांना वारंवार पराभव पाहावा लागला होता. मात्र आता धनंजय महाडिक या प्रत्येक पराभवाचा हिशोब चुकता करणार असल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com