'हिमालयात जाईन' म्हणणाऱ्या चंद्रकांतदादांचे पुन्हा चॅलेंज ; मी अजून लढलोच नाही..

दोन वर्षांपूर्वी एका सभेत बोलताना चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना चॅलेंज दिलं होतं.
'हिमालयात जाईन' म्हणणाऱ्या चंद्रकांतदादांचे पुन्हा चॅलेंज ; मी अजून लढलोच नाही..
Chandrakant Patil, Satej Patilsarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत कॉँग्रेसच्या जयश्री जाधव (Jayshree Jadhav)या विजयी झाल्या आहेत. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांचे बॅनर कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावले आहेत. चंद्रकांत पाटलांनी पुन्हा एकदा ओपन चॅलेंज दिले आहे. ते माध्यमांशी बोलत होते. (Kolhapur north assembly by election News Update)

दोन वर्षांपूर्वी एका सभेत बोलताना चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना चॅलेंज दिलं होतं. “कोल्हापूरमधून हे पळून आले आज चॅलेंज आहे आपलं. ज्याला कुणाला वाटतं त्यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील कुठल्याही मतदारसंघाचा राजीनामा द्यायचा, पोटनिवडणूक लावायची, निवडून नाही ना आलो ना तर सरळ राजकारण सोडून हिमालयात निघून जाईन,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Chandrakant Patil, Satej Patil
ईडीवादाचा हा पराभव ; भाजप नेत्यांचे गलिच्छ राजकारण जनतेनं नाकारलं!

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतील पराभवानंतर देखील चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा चॅलेंज दिलं आहे. “आमचे नाना कदम आले तर तुमच्या तोंडाला फेस आला, मी लढलो तर काय होईल. मी असं म्हटलं होतो की मी लढलो आणि हरलो तर हिमालयात जाईन, मी अजून लढलोच नाही ना. आमचे नाना लढले. अक्षरश: तुमच्या तोंडाला फेस आला,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

''या निवडणुकीत नागरिकांनी दिलेला कौल आम्ही मान्य केला आहे. कुठल्याही निवडणुकीत पराकष्टा करायची असते ती आम्ही केली. त्यानंतर यश अपश आपल्या हातात नसतं,” असं चंद्रकांतदादा म्हणाले.

जयश्री चंद्रकांत जाधव यांनी तब्बल १८ हजार ९०१ मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला आहे. या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांना एकूण ९६ हजार २२६ मत मिळाली तर भाजपचे (BJP) पराभूत उमेदवार सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांना ७७ हजार ४२६ मत मिळाली. कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने भाजपला पराभूत केले आहे.

Chandrakant Patil, Satej Patil
कोल्हापुरच्या जनतेनं त्यांचे भोंगे खाली उतरवले ; संजय राऊतांचा टोला

कॉंग्रेसचे नेते सचिव सावंत यांनी कोल्हापूर पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. ''काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या तमाम कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा हा विजय आहे. बिलोली देगलूर निवडणुकीनंतर मविआ सरकारच्या पाठीशी जनता आहे हे पुन्हा दिसले. भाजपाच्या दमनशाही व इडीवादाचा हा पराभव आहे. धर्मांधता आणि भाजपाच्या नेत्यांचे गलिच्छ राजकारण जनतेने नाकारले,'' असे टि्वट करुन सचिन सावंत यांनी भाजपला सुनावलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in