Kolhapur News : आधी पद नंतर प्रवेश; कोल्हापुरातील बड्या नेत्याची मुख्यमंत्री शिंदेंसमोर अट!

Kolhapur News : ए. वाय. पाटील यांच्या प्रवेशाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे
Cm Eknath Shinde News
Cm Eknath Shinde NewsSarkarnama

Kolhapur News : : अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षामध्ये नाराज असलेले पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी आता 'ताकही फुंकून पिण्याची भूमिका' घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून 'आधी पद द्या, मग बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena) (शिंदे गटात) प्रवेश' करतो असा प्रस्तावच त्यांनी दिल्याची जोरदार चर्चा कोल्हापूरच्या (Kolhapur) राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामुळेच त्यांचा प्रवेश लटका असल्याचेही सांगण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीत ए. वाय. पाटील यांना राधानगरी मतदारसंघातून उमेदवारी हवी होती. मात्र, के. पी. पाटील यांना ती मिळाली. त्यानंतर बिद्री कारखान्याचे चेअरमन पद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. दोन वेळा ते आश्वासन पाळले गेले नसल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात. बाजार समिती, जिल्हा बँकेतहीत अध्यक्ष पद त्यांना मिळाले नाही, त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे.

Cm Eknath Shinde News
राज्यपाल कोश्यारींच्या कृतीने पुन्हा नवा वाद? काँग्रेसकडून व्हिडिओ ट्विट

नाराजीतूनच त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती. मात्र, प्रत्यक्षात प्रवेश झाला नाही. आता गेले तीन महिने शिंदे गटात प्रवेशाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. प्रवेशाच्या दृष्टीने ते अधून मधून सूचक भाष्य करत असतात. मात्र, अलीकडे त्यांचा प्रवेश म्हणजे राष्ट्रवादी पक्षातील आपले स्थान घट्ट करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईत खासदार संजय मंडलिक, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर ए. वाय. पाटील यांची भेट घडवून आणल्याचे सांगितले जात होते. या भेटीमध्ये एकनाथ शिंदे आणि ए. वाय. पाटील यांच्यात राजकीय चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. ए. वाय. पाटील यांनी प्रवेशासाठी पद हवे, अशी अट ठेवल्याची जोरदार चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्री शिंदे कोल्हापुरात आले होते. त्याच्या कार्यक्रमाला ए. वाय. पाटील उपस्थित होते. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाची चर्चा सुरू झाली. काडसिद्धेश्वर महाराज यांनी कार्यक्रमाचे आमंत्रण दिल्यामुळे आपण कार्यक्रमाला उपस्थित होते, असा खुलासा पाटील यांनी केला आहे.

Cm Eknath Shinde News
Abdul Sattar : गुवाहाटी दौऱ्याकडे पाठ फिरवणारे सत्तार नाराज ? ; सत्तार म्हणाले..

मात्र, त्यांच्या अलीकडच्या हालचालीनुसार ते राष्ट्रवादीवर नाराज असल्याचे दिसते. एक तर राष्ट्रवादीने पद द्यावे, किंवा पद घेऊनच शिंदे गटात प्रवेश करावा, असा त्यांचा विचार आहे. तशी अटच त्यांनी घातली असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यामुळे सध्या त्यांना कोणते पद द्यायचे याबाबत शिंदे गटात चाचणी असल्याचेही सांगण्यात येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com