चुकीच्या व्यवस्थापनामुळे 'किसन वीर' कारखाना अडचणीत...मकरंद पाटील

श्री. पाटील Makrand Patil म्‍हणाले,‘‘ चुकीच्‍या व्‍यवस्‍थापनामुळे Wrong management कारखान्‍यावर आजमितीला एक हजार कोटींचे कर्ज Debt of one thousand crores आहे. कर्ज जागेवर असून, कारखान्‍यात साखरेचे एक पोतेही शिल्‍लक नाही.
Madan Bhosale, Makrand Patil
Madan Bhosale, Makrand Patilsarkarnama

सातारा : चुकीचे व्‍यवस्‍थापन आणि मनमानी कारभारामुळे किसन वीर सहकारी साखर कारखाना अडचणीत आला आहे. कारखान्‍यावर कर्जाचा डोंगर असून, यंदाचा हंगाम न झाल्‍याने लाखो टन ऊस शेतातच पडून आहे. निवडणुकीच्‍या माध्‍यमातून हा कारखाना शेतकरी आमच्‍या ताब्‍यात देतील. 'किसन वीर'सह प्रतापगड आणि खंडाळा कारखानाही आम्‍ही पूर्ण ताकदीने चालवू, असा विश्‍‍वास वाईचे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी व्‍यक्‍त केला.

किसन वीर सहकारी साखर कारखान्‍याच्‍या संचालक मं‍डळाच्या कार्यक्षेत्रातील पाच तालुक्‍यांतील समविचारी लोकांनी एकत्र येत किसन वीर शेतकरी बचाव पॅनेलची स्‍थापना केली आहे. या पॅनेलची भूमिका मांडण्‍यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पाटील बोलत होते. या वेळी जिल्‍हा बँकेचे अध्‍यक्ष नितीन पाटील, पॅनेलचे पदाधिकारी बाबासाहेब कदम उपस्‍थित होते.

Madan Bhosale, Makrand Patil
`किसन वीर`चा प्रश्न अमित शहांच्या कानावर : फडणविसांची मध्यस्थी कामी येणार का?

श्री. पाटील म्‍हणाले,‘‘ चुकीच्‍या व्‍यवस्‍थापनामुळे कारखान्‍यावर आजमितीला एक हजार कोटींचे कर्ज आहे. कर्ज जागेवर असून, कारखान्‍यात साखरेचे एक पोतेही शिल्‍लक नाही. तोट्यात असणाऱ्या या कारखान्‍याला कोणीही कर्ज देण्‍यास तयार नसल्‍याने यंदाचा हंगाम सुरू झाला नाही. कार्यक्षेत्रातील ऊस सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्‍या पुढाकाराने इतर कारखान्‍यांनी नेला असला तरी आजमितीला ५ लाख टन ऊस शेतातच पडून आहे.

Madan Bhosale, Makrand Patil
'किसन वीर'चा जरंडेश्‍वर करण्याचा डाव मोडून काढा...महेश शिंदे

किसन वीर यांनी उभारलेला कारखाना टिकावा, यासाठी इच्‍छा नसतानाही आम्‍ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. हा कारखाना यापुढील काळात सभासदांच्‍याच मालकीचा राहील, असा आम्‍ही शेतकऱ्यांना विश्‍‍वास दिला असून, त्‍यांच्‍या पाठिंब्‍यावरच आम्‍ही ही निवडणूक जिंकू.’’ अपहार, गैरव्‍यवस्‍थापनामुळेच कारखाना कर्जबाजारी झाल्‍याचा आरोपही या वेळी नितीन पाटील यांनी केला.

Madan Bhosale, Makrand Patil
किसन वीर कारखाना : मदन भोसलेंना राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटलांचे कडवे आव्हान!

ती भेट दिशाभूल करणारी....

निवडणूक सुरू असतानाच मदन भोसले यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्‍याबाबत नितीन पाटील म्‍हणाले,‘‘ मुळात कारखाना तोट्यात आहे. त्‍याच्‍यावर एक हजार कोटींचे कर्ज आहे. असे असतानाही त्यांनी श्री. शहा यांची भेट घेत एनसीपीसीकडून मदत मागितल्‍याचे सांगितले जात आहे. मुळात तसे कर्ज एनसीपीसी देवूच शकणार नाही. ही भेट म्‍हणजे निव्‍वळ शेतकरी, सभासदांची दिशाभूल करणारी असून, ते नाटक आहे.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in