किसन वीर निवडणूक ः राष्ट्रवादीच्या नितीन पाटलांची आघाडी, मदन भोसले पिछाडीवर

पहिल्या फेरीतील First Round मतमोजणीत counting आमदार मकरंद पाटील MLA Makrand Patil यांच्या पॅनेलने राखीवच्या Reserved तीन व महिला Mahila दोन जागांवर आघाडी घेतली आहे
किसन वीर निवडणूक ः राष्ट्रवादीच्या नितीन पाटलांची आघाडी, मदन भोसले पिछाडीवर
Madan Bhosale News, Nitin Patil News, Kisan veer sakhar karkhana election 2022 News Updatessarkarnama

सातारा : किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीत कवठे-खंडाळा व भुईंज या सोसायटी गटातही आमदार मकरंद पाटील यांच्या किसन वीर बचाव शेतकरी पॅनेलच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. यामध्ये कवठे-खंडाळा गटात नितीन पाटील यांनी १०,८७८ मते घेऊन आघाडीवर असून भुईंज गटात माजी आमदार मदन भोसले (७०८१ मते) पिछाडीवर आहेत. (Kisan veer sakhar karkhana election 2022 News)

किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ६९ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर बचाव शेतकरी परिवर्तन पॅनेल विरूध्द माजी आमदार मदन भोसले यांचे शेतकरी विकास पॅनेल अशी चुरशीची लढत झाली. आज वाई एमआयडीसीतील श्रीनिवास मंगल कार्यालयात मतमोजणी सुरू आहे. एकुण १५४ मतदान केंद्रांपैकी ७७ मतदान केंद्रांची मतमोजणी सध्या सुरू आहे.

Madan Bhosale News, Nitin Patil News, Kisan veer sakhar karkhana election 2022 News Updates
हिंमत असेल तर कुटुंबाच्या संपत्तीची अदलाबदल करा...मदन भोसलेंचे मकरंद पाटलांना आव्हान

या पहिल्या फेरीतील मतमोजणीत आमदार मकरंद पाटील यांच्या पॅनेलने राखीवच्या तीन व महिला दोन जागांवर आघाडी घेतली आहे. तसेच गटाच्या मतमोजणीत कवठे-खंडाळा गटा किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलचे रामदास गाढवे १०८०६, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन जाधव पाटील यांना १० ८७८, किरण राजाराम काळोखे १०५७१ मते मिळून त्यांनी आघाडी घेतली आहे. तर विरोधी मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलच्या दत्तात्रेय गाढवे यांना ६८६३, प्रवीण विनायक जगताप ७८०६, प्रताप ज्ञानेश्वर यादव ६८०१ मते मिळाली आहे.

Madan Bhosale News, Nitin Patil News, Kisan veer sakhar karkhana election 2022 News Updates
'किसन वीर'ची निवडणूक : मकरंद पाटलांच्या पॅनेलची राखीव गटात आघाडी...

भुईंज गटात मकरंद पाटील यांच्या पॅनेलच्या प्रकाश धुरगुडे यांना १०५८३, रामदास महादेव इथापे १०४९७, प्रमोद भानुदास शिंदे यांना १०४५८ मते मिळून आघाडी घेतली आहे. तर शेतकरी विकास पॅनेलच्या जयवंत पवार ६८९५, दिलीप शिंदे ६६६९, मदन प्रतापराव भोसले ७०८१ मते मिळाली आहेत. तर अपक्ष मानसिंग नारायण शिंगटे यांना ७५ मते मिळाली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.