किसन वीर निवडणूक : आमदार महेश शिंदेंची जादू चालली नाही...

महत्वाचे म्हणजे कोरेगावचे Koregaon आमदार महेश शिंदे MLA Mahesh Shinde यांनी मदन भोसले Madan bhosale यांच्यासोबत राहून कारखाना पुन्हा त्यांच्याच ताब्यात राहण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले.
Makrand Patil, Mahesh shinde, Nitin Patil
Makrand Patil, Mahesh shinde, Nitin Patilsarkarnama

सातारा : किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार मदन भोसले यांच्या बाजूने कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी प्रचारात उडी घेतली होती. त्यांनी झोकून देऊन प्रचार करूनही राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या करिष्म्यापुढे महेश शिंदेंची जादू चालली नाही. कोरेगावातही मकरंद पाटील व नितीन पाटील यांच्या पॅनेलला साडे तीन ते चार हजारांचे मताधिक्क्य कायम राहिले आहे.

किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ६९ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर बचाव शेतकरी परिवर्तन पॅनेल विरूध्द माजी आमदार मदन भोसले यांचे शेतकरी विकास पॅनेल अशी चुरशीची लढत झाली. आज वाई एमआयडीसीतील श्रीनिवास मंगल कार्यालयात मतमोजणी झाली.

Makrand Patil, Mahesh shinde, Nitin Patil
चुकीच्या व्यवस्थापनामुळे 'किसन वीर' कारखाना अडचणीत...मकरंद पाटील

एकुण १५४ मतदान केंद्रांपैकी पहिल्या टप्प्यात ७७ मतदान केंद्रांची मतमोजणी करण्यात आली. या पहिल्या फेरीतील मतमोजणीत आमदार मकरंद पाटील यांच्या पॅनेलने राखीवच्या तीन व महिला दोन तसेच पाच गटातही आघाडी घेतली होती. साधारणपणे साडे तीन ते चार हजारांचे मताधिक्य राहिले होते. वाईचे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी शेतकरी सभासदांच्या आग्रहाखातर पॅनेल टाकले होते.

तर सत्ताधारी माजी आमदार मदन भोसले यांनी किसन वीरचे खासगीकरण रोखण्यासाठी पुन्हा कारखाना ताब्यात देण्याचे आवाहन करत पॅनेल टाकले होते. या निवडणुकीत पाच तालुक्यांतील चार आमदारांनी लक्ष घातले होते. यामध्ये आमदार मकरंद पाटील, महेश शिंदे, शशीकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लक्ष घातले होते. मदन भोसले यांच्या बाजूने कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे प्रचारात सक्रिय सहभागी झाले होते.

Makrand Patil, Mahesh shinde, Nitin Patil
आमदार गोरेंच्या अटकेसाठी राष्ट्रवादी आक्रमक; महेश तपासे घेणार सातारा एसपींची भेट...

तर मकरंद पाटील यांच्या बाजूने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशीकांत शिंदे हे सहभागी झाले होते. खासदार उदयनराजेंनी मात्र, या निवडणुकीपासून अलिप्त राहात सातारा तालुक्यातील त्यांच्या सभासदांना योग्य तो निर्णय घेण्याची सूचना केली होती.

शिवेंद्रसिंहराजेंनीही राष्ट्रवादीच्याच पॅनेलला साथ देण्याची सूचना सातारा तालुक्यातील मतदारांना केली होती. महत्वाचे म्हणजे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी मदन भोसले यांच्यासोबत राहून कारखाना पुन्हा त्यांच्याच ताब्यात राहण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी कोरेगाव, सातारा, वाई, मेढा, खंडाळा या ठिकाणी झालेल्या प्रचार सभांत सहभागी होऊन शेतकरी सभासदांना मदन भोसले यांना साथ देण्याचे आवाहन केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com