Ajit Pawar, Kirit Somayya
Ajit Pawar, Kirit Somayyasarkarnama

किरीट सोमय्या उद्या साताऱ्यात; अजित पवारांचे काय टेन्शन वाढवणार

श्री. सोमय्या जरंडेश्वर कारखान्याला भेट देऊन तेथील पहाणी करणार आहेत. तसेच जरंडेश्वरचे पदाधिकारी व सभासदांसह शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

सातारा : जरंडेश्वर कारखान्याच्या खरेदी प्रकरणात झालेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या उद्या (बुधवारी) जरंडेश्वर कारखान्याची पहाणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आणखी काय टेन्शन वाढविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यात त्यांचे विविध ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते स्वागत करणार आहेत. एकुणच श्री. सोमय्या यांचा हा दौरा वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.

जरंडेश्वर कारखान्याच्या खरेदी प्रकरणी ईडीने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ८६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कारखान्याची चौकशी सुरू असून या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या उद्या (बुधवारी) जरंडेश्वर कारखान्याला भेट देत आहेत. यानिमित्ताने श्री. सोमय्या यांचे कोरेगाव, खटाव व फलटण तालुक्यात स्वागत होणार आहे. श्री. सोमय्या जरंडेश्वर कारखान्याला भेट देऊन तेथील पहाणी करणार आहेत. तसेच जरंडेश्वरचे पदाधिकारी व सभासदांसह शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

Ajit Pawar, Kirit Somayya
कोणी कितीही गर्जना करू देत; जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचेच पॅनेल येणार...

कोरेगाव व खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांनी अनेक संघर्षातून जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. १९९२ मध्ये कारखान्याला परवाना मिळाला. त्यानंतर पहिला गळीत हंगाम १९९९ मध्ये होऊन त्यावेळी १२ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले. मात्र, नंतरच्या काळात कारखान्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे वारणा कारखान्याचे विनय कोरे यांनी दोन वर्षे, झुंजुनवाला यांच्या केन शुगरने दोन वर्षे आणि स्नेहा शुगर सांगली यांनी एक वर्षे भाडे करारावर कारखाना चालविला.

Ajit Pawar, Kirit Somayya
किरीट सोमय्या म्हणतात, ईडीची जप्ती आलेला जरंडेश्वर कारखाना अजित पवारांचा!

मात्र, राज्य सहकारी बँकेने कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. त्यावर कारखान्यावर १२० कोटींचे कर्ज होते. मात्र, कारखान्याचे व्हॅल्युएशन ११० कोटी असतानाही राज्य सहकारी बँकने जप्तीची कारवाई केली. त्यानंतर हा कारखाना गुरू कमोडिटी या कंपनीला ६५ कोटी ७५ लाखांना विकला. या गुरू कमोडिटीज या कंपनीच्या मागे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हात असल्याचा आरोप डॉ. शालिनीताई पाटील यांनी केला होता. यानंतर गुरू कमोडिटीने जरंडेश्वर शुगर मिल ही भाडे तत्वावर करार करीत कंपनी उभी केली. या कारखान्याने सात सहकारी बँकेच्या माध्यमातून ४७२ कोटी रूपये कर्ज उचलले आहे.

Ajit Pawar, Kirit Somayya
मी देवेंद्रजींना विचारलंय...हमरीतुमरी किती पातळीपर्यंत करायची? : उद्धव ठाकरे

त्यानंतर दहा वर्षे कारखान्याचे गळीत सुरू आहे. हा कारखाना चुकीच्या पध्दतीने खरेदी केला, असे आरोप करत डॉ. शालिनीताई पाटील यांनी उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली. याबरोबरच शेकापचे माजी आमदार माणिकराव जाधव, सामाजिक सुनील अरोरा, अण्णा हजारे यांनी याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने कारखान्याच्या चौकशीचे आदेश दिले आणि ईडीने गुन्हा दाखल केला. एक जुलै २०२१ रोजी ८६ जणांवर गुन्हे दाखल झाले. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य सहकारी बँकेच्या संचालकांचा समावेश आहे.

Ajit Pawar, Kirit Somayya
सहकारातील चुकीच्या प्रवृत्तींवर कारवाई करा : अजित पवार

त्याच दरम्यान, दिल्ली युनिकने चार हजार पानाचे आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मनी लॉन्ड्रींग प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप करत हा कारखाना चुकीच्या पध्दतीने विकला आहे. आता कारखाना सभासदांच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माजी खासदार किरीट सोमय्या उद्या (बुधवारी) जरंडेश्वर कारखान्यावर जाऊन पहाणी करणार आहेत. तसेच या कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी सभासदांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे श्री. सोमय्या यांचा हा दौरा वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.

सोमय्या यांचा दौरा असा आहे...

उद्या बुधवारी पहाटे सव्वा तीन वाजता त्यांचे सातार रेल्वे स्थानक येथे आगमन होईल. त्यानंतर ते शासकिय विश्रामगृहात येतील व तेथे मुक्काम करतील. गुरूवारी सकाळी साडे नऊ वाजता ते कोरेगावकडे जातील. तेथे आझाद चौक व जुना मोटर स्टँड येथे त्यांचे स्वागत होईल. साडे दहा वाजता ते जरंडेश्वर साखर काखान्याची पहाणी करतील तसेच चिमणगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर ते पुसेगावकडे जातील तेथे त्यांचे स्वागत होईल. त्यानंतर डिस्कळ व फलटण येथेही त्यांचे स्वागत होईल. दुपारी पावणे एक वाजता ते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या राजभवन या निवासस्थानी जातील. तेथून ते बारामतीला जातील. दुपारी पावणे दोन वाजता त्यांचे बारामतीत आगमन होईल. खरमाटेच्या जागेची पहाणी करतील. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून जेजुरी, सासवड मार्गे फुरसंगीला जातील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com