महाराष्ट्र केसरी : किरण भगत बाहेर पडल्याने साताऱ्याला धक्का

माती विभागात साताऱ्याच्या satara किरण भगतकडे Kiran Bhagat सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. किरणने सुरवातीलाच वेताळला vetal कोंडी मारण्याचा प्रयत्न केला.
Kiran Bhagat
Kiran Bhagatsatara

सातारा : महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या माती विभागातून साताऱ्याच्या किरण भगत याला आज पराभवाचा धक्का बसला. गोंदियाच्या वेताळ शेळके याने त्याच्यावर ४ विरुद्ध ३ गुणांच्या फरकाने मात केली. गतविजेत्या हर्षवर्धन सदगीर याने मुंबई पूर्वच्या आदर्श गुंड याला ८ विरुद्ध २ गुण फरकाने पराभूत केले.

सायंकाळच्या सत्रात महाराष्ट्र केसरीच्या फेरीला प्रारंभ झाला. माती विभागात साताऱ्याच्या किरण भगतकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. किरणने सुरवातीलाच वेताळला कोंडी मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा प्रयत्न वेताळने निष्फळ ठरवला. सहा मिनिटांत त्याला तीन, तर वेताळने चार गुण मिळवले. गादी विभागात हर्षवर्धनने आदर्शला ८ विरूद्ध २ गुण फरकाने पराभूत केले.

Kiran Bhagat
हिंद केसरी लढायला मज्जा येते, म्हणून मी शरद पवारांविरोधात लढणार : महादेव जानकर

कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील, बुलढाण्याचा समीर शेख, सोलापूरचा नारायण सोलणकर, वाशिमचा नयनेश निकम, साताराचा दिग्विजय जाधव यांनी याच विभागात प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले. माती विभागातून अमरावतीचा माऊली जमदाडे, वर्धाचा राहुल नागटिळक, रत्नागिरीचा संतोष दोरवडने पुढच्या फेरीत प्रवेश केला.

Kiran Bhagat
कुस्ती स्पर्धेवरून साताऱ्यात दोन दिग्गज पहिलवानांची घराणी भिडली....

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित ६४ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब मैदान जिल्हा क्रीडा संकुलात सुरू आहे. मैदानात ७० किलो गादी विभागात कोल्हापूरच्या सोनबा गोंगाने याने सुवर्णपदकावर नाव कोरले. कोल्हापूरच्या सुशांत तांबूळकर याने ९२ किलो गटात प्रतिस्पर्ध्यावर पंधरा सेकंदात तांत्रिक गुणांवर मात केली.

Kiran Bhagat
पंतप्रधान मोदी अन् पवारांमधील भेटीनंतर अजित पवार अन् जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य

अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत ५७ किलो गादी विभागात सोलापूरच्या सौरभ ईगवेने प्रतिस्पर्ध्याला एका गुणाची आघाडी घेत बाजी मारली. माती विभागातून ५७ किलो सोलापूरचा जोतिबा अटकळे, ७० किलोमध्ये पुण्याचा निखिल कदम, तर ९२ किलोत बीडच्या अमोल मुंडेने सुवर्ण पदक पटकावले.

Kiran Bhagat
पुणे महानगरपालिका मालामाल : उत्पन्न पहिल्यांदाच सहा हजार कोटींवर

सायंकाळच्या सत्रात महाराष्ट्र केसरी फेरीला प्रारंभ झाला. माती विभागात साताऱ्याच्या किरणच्या भगतकडे सर्वांच्या नजरा होत्या. किरणने सुरवातीलाच वेताळला कोंडी मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा प्रयत्न वेताळने निष्फळ ठरवला. सहा मिनिटांत त्याला तीन, तर वेताळने चार गुण मिळवले. गादी विभागात हर्षवर्धनने आदर्शला ८ विरूद्ध २ गुण फरकाने पराभूत केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com