किरकसाल सोसायटी बिनविरोध : अध्यक्ष, उपाध्यक्षपदी दिली महिलांना संधी

एकाच वेळी सोसायटीच्या Society दोन्ही पदांवर महिलांना Mahila संधी मिळाल्याची पहिलीच घटना माण तालुक्यात Maan Taluka घडली आहे.
Kiraksal Society Members
Kiraksal Society Memberssarkarnama

गोंदवले (ता. माण) : किरकसाल विकास सेवा सोसायटीची निवडणूक सलग दुसऱ्यांदा बिनविरोध करत अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोन्ही पदांवर एकाच वेळी महिलांना संधी देऊन माण तालुक्यात पहिल्यांदाच किरकसालकरांनी इतिहास घडविलाय. येथील श्री भैरवनाथ विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी सौ. जोत्स्ना विलास काटकर तर उपाध्यक्षपदी सौ. शकुंतला विलास काटकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून आदर्श गाव किरकसालच्या ग्रामस्थांनी एकजूट दाखवत ग्रामविकासाला गती देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.या एकजुटीतूनच आता किरकसालकरांनी राजकारणाला फाटा देत येथील श्री भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूकही बिनविरोध करण्यात यश मिळवले आहे.

Kiraksal Society Members
शरद पवार म्हणाले, ज्यांनी मला जातीयवादी म्हणून हिणवलं...

या सोसायटीची तेरा संचालक कमिटी आहे.गेल्या महिन्यात सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली होती.त्यासाठी ३६ उमेदवारी अर्जही दाखल झाले होते.परंतु दरम्यानच्या काळात सर्वपक्षीय गट-तटांच्या सदस्यांनी एकत्र येत ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला.सर्वांच्या विचारातून सोसायटीच्या संचालकांची निवड करण्यात आली.

Kiraksal Society Members
रणजितसिंह निंबाळकरांचे प्रयत्न; माण, खटावच्या १८१ गावात मिळणार नळाद्वारे पाणी...

उर्वरित उमेदवारांनीही ग्रामविकासाचा अजेंडा ध्यानात घेऊन मोठ्या मनाने निवडणुकीतून माघार घेत उमेदवारी अर्ज काढून घेतले. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातून वसंत चांगदेव शिंदे,सुभाष सोपान काटकर, चंद्रकांत सिताराम काटकर, निवृत्ती शंकर काटकर, पोपट विष्णु काटकर, विठ्ठल आण्णा शिंदे, संतोष नारायण काटकर, राजेंद्र जयसिंग काटकर यांची निवड करण्यात आली.

Kiraksal Society Members
ओबीसी आरक्षण : तिढा सोडविण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू...शरद पवार

तसेच महिला राखीव प्रवर्गातून जोत्स्ना विलास काटकर व शकुंतला विलास काटकर तर इतरमागास प्रवर्गातून अर्जुन नामदेव कुंभार,विशेष मागास प्रवर्गातून अजित सोपान चोरमले व अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून सुखदेव शंकर रणपिसे यांची एकमताने निवड करण्यात आली. आज अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत देखील हाच एकोपा टिकविण्यात यश मिळाले.

Kiraksal Society Members
सातारा जिल्हा बँकेची राष्ट्रीयकृत बँकांशी बरोबरी; सर्व कर्ज व्याजदरात केली कपात

त्यामध्ये सौ जोत्स्ना विलास काटकर यांची अध्यक्षपदी तर सौ. शकुंतला विलास काटकर यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यामुळे एकाच वेळी सोसायटीच्या दोन्ही पदांवर महिलांना संधी मिळाल्याची पहिलीच घटना माण तालुक्यात घडली आहे. या ऐतिहासिक घटनेची चर्चा सर्वत्र सुरू असून नवसंचालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Kiraksal Society Members
माझ्या ताब्यात 'ईडी' द्या, दाखवतो सगळ्यांना... खासदार उदयनराजे

असाही योगायोग...

किरकसालमध्ये बहुतांशी कुटुंबे काटकर आडनावाची आहेत.त्यातील विलास काटकर या  एकाच नावाच्या दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या पत्नींना सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी संधी मिळाली आहे.

Kiraksal Society Members
Video: आर्थिक निकषांवर आरक्षण देऊन टाका; उदयनराजे भोसले

शरद पवार साहेबांनी महिला आरक्षणाचे धोरण राबविल्यामुळेच आम्हाला सहकारातील उच्च पदावर संधी मिळाली.सभासदांच्या हिताची व विकासाची कामे करून या संधीचे नक्कीच सोनं करू.

- जोत्स्ना काटकर, शकुंतला काटकर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com