Shivsena : युवासेनेला खिंडार; रणजितसिंह भोसलेंचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश

शिवसेना Shivsena संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील Nitin Banugade Patil यांच्यावर रणजितसिंह भोसले Ranjitsinh Bhosale नाराज असल्याची चर्चा होती.
Ranjitsinh Bhosale, Eknath shinde
Ranjitsinh Bhosale, Eknath shindesarkarnama

सातारा : शिवसेनेच्या युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंच्या हस्ते त्यांचा प्रवेश झाला. यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेला लागलेली गळती थांबेना झाली असून आता युवकांची फळीही निखळली आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे माजी जिल्हा प्रमुख नानासाहेब भोसले यांचे चिरंजीव रणजितसिंह भोसले यांच्याकडे शिवसेनेच्या युवा सेनेचे जिल्हा प्रमुख पद होते. त्यांनी जिल्ह्यात युवकांचे मोठे संघटन उभे केले होते. आज मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांनी शिंदे गट शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी राज्यचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव, उपस्थित होते.

Ranjitsinh Bhosale, Eknath shinde
शिवसेना ही शिंदेचीच, ठाकरे हा, तर गट ; बावनकुळेंनी शिवसेनेला डिवचलं

श्री. भोसले यांच्यासमवेत जिल्ह्यातील युवा सेनेच्या पदाधिकारी युवकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांच्यावर रणजितसिंह भोसले नाराज असल्याची चर्चा होती. निष्ठावंतांना बाजूला ठेऊन वरिष्ठ नेते स्वतः चे जाळे तयार करण्याचे काम करत होते. त्यामुळे युवा सेना जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Ranjitsinh Bhosale, Eknath shinde
शिवसेनेवर एकनाथ शिंदेंचाच हक्क : संपत्तीला वारस असतो, पक्षाला नाही - मुनगंटीवार

आज त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रणजितसिंह भोसले यांचा सत्कार करण्यात्र आला. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शारदाताई जाधव, विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख संभाजीराव पाटील, माथाडीचे जिल्हा प्रमुख प्रशांत शिंदे या प्रमुख कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी जिल्हा संघटक चंद्रकांत जाधव, जिल्हाप्रमुख जयवंत शेलार व सात उपजिल्हा प्रमुख व १५ तालुका प्रमुख समवेत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in