नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या अध्यक्षपदी खेमनर, उपाध्यक्षपदी पवार

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच झाली.
Ahmednagar District Primary Teachers Bank, Shikshak bank Ahmednagar News
Ahmednagar District Primary Teachers Bank, Shikshak bank Ahmednagar NewsSarkarnama

अहमदनगर - अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच झाली. त्यात किसनराव खेमनर 13 मतांनी विजयी झाले. उपाध्यक्षपदी सुयोग पवार यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेचे अध्यक्ष अविनाश निंभोरे व उपाध्यक्ष गंगाराम गोडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक आज (रविवारी) पार पडली. ( Khemnar as Chairman of Nagar District Primary Teachers Bank, Pawar as Vice Chairman )

ही निवडणूक जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बॅंकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक बिनविरोध होईल, अशी आशा सर्वांना होती. ही आशा फोल ठरली. निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याअगोदरच विद्युल्लता आढाव यांनी सर्व संचालकांनी सहकार्य करून महिलेला अध्यक्ष होण्याची संधी द्यावी, अशी विनंती केली. त्यानंतर निवडीचा कार्यक्रम सुरू झाला. बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी किसनराव खेमनर व विद्युल्लता आढावा यांनी अर्ज दाखल केला. उपाध्यक्षपदासाठी सुयोग पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली.

Ahmednagar District Primary Teachers Bank, Shikshak bank Ahmednagar News
यामुळे नगरची जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंक पुन्हा ठरतेय चर्चेचा विषय

अध्यक्षपदासाठी दोन अर्ज आल्याने निवडणूक घेण्यात आली. त्यात आढावा यांना आठ, तर खेमनर यांना 13 मते पडली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खेमनर विजयी झाल्याचे जाहीर केले. निवडणूक निर्णय अधिकारी आहेर यांना विक्रम मुटकुळे, बॅंकेचे व्यवस्थापक दिलीप मुरदारे यांनी सहकार्य केले.

या वेळी अविनाश निंभोरे, गंगाराम गोडे, सलीमखान पठाण, बाबासाहेब खरात, राजू राहाणे, उषा बनकर, शरद सुद्रिक, अर्जुन शिरसाठ, संतोष दुसुंगे, नानासाहेब बडाख, साहेबराव अनाप, बाळासाहेब मुखेकर, सीमा क्षीरसागर, विद्युल्लता आढाव, दिलीप औताडे, राजू मुंगसे, संतोष अकोलकर, अनिल भवार, मंजूषा नरवडे आदी उपस्थित होते.

Ahmednagar District Primary Teachers Bank, Shikshak bank Ahmednagar News
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत सत्तांतर

गुरुमाऊली मंडळाने आपल्यावर विश्‍वास ठेवून उमेदवारी दिली. सर्वांनी आपल्याला साथ दिल्यामुळे अध्यक्ष होता आले. सर्वांच्या विश्‍वासाला सार्थ असे आपण काम करणार आहे. बाहेरील शक्ती संचालकांना फूस लावण्याचे काम करतात. अध्यक्षपदासाठी निवडणुकीत त्यांनी आज तेच केले आहे. त्यांचा आपण निषेध करतो.

- किसनराव खेमनर, अध्यक्ष, जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंक.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in