Satara : खंडाळा, 'किसन वीर' FRP प्रमाणेच दर देणार... मकरंद पाटलांचा शब्द

या कारखान्यावर Sugar Factory सत्ता जरी राष्ट्रवादीची NCP असली तरी कारखाना हा सर्व शेतकरी बांधवांचा आहे. म्हणुन आपला ऊस येथे घालण्यास काटकसर करू नये, असेही मकरंद पाटील Makrand Patil यांनी स्पष्ट केले.
Makrand Patil, Nitin Patil
Makrand Patil, Nitin Patilsarkarnama

खंडाळा : मोठ्या कर्जात व देणीत अडकलेले खंडाळा व भुईंज हे दोन्ही साखर कारखान्यांचे हंगाम सुरू असला तरी हे कारखाने सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी भागभांडवल जमा करावे. आपला ऊसही या कारखान्यांना घालावा. कितीही अडचण आली तरी दोन्ही कारखाने चालवणार असुन एफआरपीप्रमाणेच दर देणार असल्याचे किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मकरंद पाटील यांनी खंडाळा येथे स्पष्ट केले.

खंडाळा कारखान्यात उत्पादित केलेल्या पाच हजार एक व्या साखरेच्या पोत्याचे पुजन व वाढदिवसाच्या सत्कार कार्यक्रमात आमदार मकरंद पाटील बोलत होते. मकरंद पाटील म्हणाले, पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या या दोन्ही कारखान्यांची अवस्था बिकट होती.

तरी अडचणी संपलेल्या नसून यापुढेही आपल्याला हा कारखाना दिमाखदारपणे चालवण्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेअर्सची रक्कम कारखान्याकडे जमा करावी. तसेच अपेक्षित असलेले चार लाख मेट्रीकटन गाळप क्षमता पूर्ण करण्यासाठी आपला ऊस या कारखान्याला घालवा असे आवाहन त्यांनी केले.

Makrand Patil, Nitin Patil
Wai : किसन वीर मधील हुकुमशाही हद्दपार; घामाचा पैसा त्यांच्याकडून वसूल करणार...

तर या कारखान्यावर सत्ता जरी राष्ट्रवादीची असली तरी कारखाना हा सर्व शेतकरी बांधवांचा आहे. म्हणुन आपला ऊस येथे घालण्यास काटकसर करू नये. सोमेश्वरच्या तोडीने हे कारखाने चालवू, असे स्पष्ट मत आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केले.

Makrand Patil, Nitin Patil
'किसन वीर'चा यावर्षीचा हंगाम यशस्वी करणार... मकरंद पाटील

नितीन भरगुडे पाटील म्हणाले, तालुक्याची सर्व सत्तास्थान राष्ट्रवादीकडे असून या कारखान्यावर कारखान्याची मोळी टाकताना मोठा पाऊस झाला या पावसात सर्व साडेसाती धुवून गेली. आता यापुढे आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या क्षमतेने हा कारखाना सुरू राहणार आहे. कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्याचे प्रतीक म्हणून बैलगाडीची प्रतिमा व शाल देऊन आमदार मकरंद पाटील यांचा सन्मान करण्यात आला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in