Khadse : राष्ट्रवादी काॅंग्रेस एक नंबरचा पक्ष आणि २०२४ मध्ये आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे..

अनेकजण पुन्हा सत्ता आणण्यासाठी उतावीळ झाले आहेत. उतावीळ नवरा गुडघ्याला बाशिंग अशी त्यांची स्थिती झाली आहे. पण सत्ता सुंदरी काही त्यांना मिळणार नाही. (Eknath Khadse)
Ncp Leader Eknath Khadse
Ncp Leader Eknath KhadseSarkarnama

कोल्हापूर : राज्यात सध्या घाणेरडे राजकारण सुरू आहे, माझ्या चाळीस वर्षाच्या राजकारणात अशी परिस्थिती कधी पाहिली नाही. (Ncp) हे सरकार पडत नाही म्हटल्यावर विरोधकांकडून सुडाचे राजकारण सुरू आहे. पण याचे काय करायचे ते नेते ठरवतील, कार्यकर्त्यांनी मात्र महागाईच्या मुद्यावर रस्त्यावर उतरलं पाहिजे. फक्त निवेदन देऊन त्याचे फोटो शरद पवारांकडे पाठवून भागणार नाही. (Kolhapur) राष्ट्रवादीचा कार्यकर्ता खंबीर झाला पाहिजे.

येणाऱ्या २००२४ मध्ये राष्ट्रवादी हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष आणि आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे, हाच संकल्प या संकल्प सभेतून घेऊन प्रत्येकाने गेलं पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थीतीत कोल्हापूरात होत असलेल्या संकल्प सभेत खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्र सरकारवर टीका केली.

फडणवीस म्हणजे, सत्ता सुंदरीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेला उतावीळ नवरा असल्याची टीकाही खडसे यांनी केली. खडसे म्हणाले, राज्यात सध्या घाणेरडे राजकारण सुरू आहे, सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मग ईडी, खोटे आरोप, धाडी, हनुमान चालीसा असे प्रकरा सुरू आहेत. पण आघाडी सरकार भक्कम आहे आणि ते पाच वर्ष टिकेल.

त्यापुढेही राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येईल, पण त्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने रस्त्यावर उतरून जनतेच्या प्रश्नावर आंदोलनं केली पाहिजेत. आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील २२४ विधानसभा मतदारसंघात संवाद यात्रा काढून कार्यकर्त्यांना तयार केले. पक्षाची ताकद वाढवली. त्यामुळे २०२४ मध्ये राष्ट्रवादी हा एक नंबरचा पक्ष होऊन आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे, हाच संकल्प या निमित्ताने प्रत्येकाने केला पाहिजे.

Ncp Leader Eknath Khadse
MNS : `राज`सभेची मनसेकडून जय्यत तयारी ; घरोघरी जाऊन निमंत्रण..

अनेकजण पुन्हा सत्ता आणण्यासाठी उतावीळ झाले आहेत. उतावीळ नवरा गुडघ्याला बाशिंग अशी त्यांची स्थिती झाली आहे. पण सत्ता सुंदरी काही त्यांना मिळणार नाही, हे त्यांच्या लक्षात आल्यामुळेच ते आता वेगळ्या पद्धतीने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधकांना संपवण्याचे राजकारण राज्यात सुरू आहे, माझ्यावर खोटे आरोप झाले, धाडी टाकल्या ६७ वेळा निवडणुक काळात माझे आणि माझ्या पीएचे फोन टॅप केले.

संजय राऊत यांचेही फोन त्या काळात टॅप करण्यात आले. आपले अनिल देशमुख यांच्यावर ११० वेळा धाडी टाकल्या. पण हे सरकरा भक्कमपणे उभे आहे. जोर्यंत शरद पवार खंबीरपणे या सरकारच्या पाठीमागे उभे आहेत, तोपर्यंत सरकारला धोका नाही, असा विश्वास देखील खडसे यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in