Kdcc Bank Election : अखेर गुलाल यड्रावकरांवर ; राजू शेट्टींचा विरोध कुचकामी ठरला

राजेंद्र यड्रावकर यांना ९८ मते मिळाली, तर गणपतराव पाटील यांना ५२ मते पडली.
KDCC Bank Election Result Updates

KDCC Bank Election Result Updates

sarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत (kdcc bank election) मतमोजणीला सुरवात झाली आहे. या निवडणुकीत ९८ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक चुरस ही शिरोळ तालुका विकास संस्था गटातील उमेदवार राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar Win KDCC Bank Election) आणि गणपतराव पाटील यांच्यात होती. माजी खासदार राजू शेट्टी हे स्वत: पाटील यांचे मतदान प्रतिनिधी म्हणून केंद्रात उपस्थित होते, त्यामुळे या लढतीकडे कोल्हापूर जिल्ह्याचेच नव्हे; तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. राजेंद्र यड्रावकर यांना ९८ मते मिळाली, तर गणपतराव पाटील यांना ५२ मते पडली. (KDCC Bank Election Result Updates)

राज्यात आघाडीवर असणाऱ्या काही जिल्हा बॅंकांमध्ये कोल्हापूर बॅंकेचा क्रमांक वरचा आहे. ही बॅंक ताब्यात ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या पॅनेल तसेच शिवसेनेच्या पॅनेलने शर्थीने निवडणूक लढवली आहे. प्रचारात आलेल्या रंगतीप्रमाणेच मतदानही ९८ टक्के झाले आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले होते.

<div class="paragraphs"><p>KDCC Bank Election Result Updates</p></div>
मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार ; महिलेच्या केसांवर थुंकले जावेद हबीब

कोल्हापूर जिल्हा बॅंकेसाठी मंगळवारी (ता. 5) चुरशीने मतदान झाले, त्यानंतर कोण-कोणत्या गटात चुरस होईल, याची चर्चा जिल्हाभर सुरु आहे. बॅंकेच्या शिरोळ संस्था गटातून उमेदवार असणारे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मतदान झाल्यानंतर विजयी जल्लोष केला. तसेच, त्यांच्या विजयाचे डिजिटल फलकही झळकले आहेत. यड्रावकर यांच्याविरोधात गणपतराव पाटील यांनीही तेवढ्याच ताकदीने प्रचार करुन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. शिवाय त्यांच्या पाठीशी आपली ताकद लावून माजी खासदार राजू शेट्टी हे स्वत: पाटील यांचे मतदान प्रतिनिधी म्हणून केंद्रात उपस्थित होते, त्यामुळे या लढतीकडे कोल्हापूर जिल्ह्याचेच नव्हे; तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

''साहेब बँकेत सगळे चोर आहेत, निवडणुकीत एकमेकांवर टीका करतात. नंतर गळ्यात गळे. बँकेवर कायमस्वरूपी प्रशासक नेमा,'' अशा शब्दात मतदारांनी मतपेटीत चिठ्य़ा टाकल्याचे समोर आले आहे. मतमोजणीत या अशा मजकुराच्या चिठ्य़ा सापडल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com