Satara : कास अतिक्रमण नोटिसा : तहसीलदार यांची बदली

सातारा तालुक्यातील Satara taluka वाळू चोरीच्या Theft of sand प्रकरणांमध्ये त्यांनी कणखर भूमिका घेतली होती. अनेक बेकादेशीर उत्खननांना Illegal mining त्यांनी चांगलाच चाप बसविला होता.
Asha Holkar
Asha Holkarsarkarnama

सातारा : कास पठारावरील अतिक्रमणांना नोटीस बजाविणाऱ्या साताऱ्याच्या तहसीलदार आशा होळकर यांची बदली झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक शाखेत त्यांची बदली करण्यात आली आहे. होळकर यांच्या जागी जिल्हा पुरवठा शाखेचे सहाय्यक पुरवठा अधिकारी राजेश जाधव यांना साताऱ्याचे तहसीलदार म्हणून पदभार देण्यात आला आहे.

महसूल प्रशासनाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी हे बदलीचे आदेश बजावले आहेत. याशिवाय संजय गांधी निराधार योजनेचे उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई यांची मुंबई मंत्रालय येथे बदली झाली आहे. राज्यात शिंदे गट आणि भाजप युतीचे सरकार स्थान आपण होताच राज्यात महसूल विभागाच्या बदल्याचे सत्र सुरूच आहे.

Asha Holkar
'तहसीलदार रात्री घाबरत; तर पोलिस अधिकारी हे कोणी नसल्याचे पाहूनच भेटायला यायचे!'

जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीनंतर महसूल प्रशासनातील तहसीलदार पदांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. सातारा महसूल विभागातील बदल्यांचा ईमेल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागाला पाठवला आहे. यामध्ये काही दिवसांपूर्वी कास पठारावरील अतिक्रमणांना नोटिसा बजावून ते अतिक्रमण काढण्यासाठी सात दिवसांची मुदत देणाऱ्या साताऱ्याच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार आशा होळकर यांची कोल्हापूरला बदली झाली आहे.

Asha Holkar
पुरूषोत्तम जाधव झाले शिंदे गट शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख...

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत तहसीलदार पदावर त्यांची बदली झाली आहे. साताऱ्याची तहसीलदार म्हणून जिल्हा पुरवठा विभागाचे सहाय्य पुरवठा अधिकारी राजेश सदाशिव जाधव यांच्याकडे तहसीलदार पदाचा पदभार देण्यात आला आहे. पदाधिकाऱ्यांना तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Asha Holkar
तर एकनाथ शिंदे यांना विचार करण्याची गरज ; भास्कर जाधवांचे सूतोवाच

22 फेब्रुवारी 2019 मध्ये तत्कालीन तहसीलदार निलप्रसाद चव्हाण यांची बदली झाल्यानंतर आशा होळकर यांनी सातारा तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारला होता. झिरो पेंडन्सी आणि पारदर्शक कारभार म्हणून आशा होळकर यांनी आपला चांगलाच धाक निर्माण केला होता. विशेषतः सातारा तालुक्यातील वाळू चोरीच्या प्रकरणांमध्ये त्यांनी कणखर भूमिका घेतली होती.

Asha Holkar
धनंजय मुंडे यांच्या कारखान्याकडे एक रुपयाही थकीत नाही

अनेक बेकादेशीर उत्खननांना त्यांनी चांगलाच चाप बसविला होता. करोनाच्या काळात सातारा शहरातील परिस्थिती त्यांनी उत्कृष्टरित्या हाताळली. आठवड्यापूर्वीच कास पठारावरील 124 बांधकामांना त्यांनी नोटीस बजावत बांधकामे काढण्याबाबत नोटिसा पाठवून खळबळ उडवली होती. या पार्श्वभूमीवर त्यांची कोल्हापूरला बदली झाल्याने पुन्हा उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात या नियमित बदल्या असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com