अमित शाहंची मध्यस्ती निष्फळ? शिंदेंच्या खासदाराला कर्नाटकात जाण्यासाठी प्रवेशबंदी

Maharashtra-Karnataka dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष आणि खासदार धैर्यशिल माने (Dhairyasheel Mane) यांच्यावर परत एकदा बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
Amit Shah, Eknath Shinde, Basavaraj Bommai
Amit Shah, Eknath Shinde, Basavaraj BommaiSarkarnama

Maharashtra-Karnataka dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष आणि खासदार धैर्यशिल माने (Dhairyasheel Mane) यांच्यावर परत एकदा बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ६ डिसेंबरला महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह खासदार माने यांच्यावर प्रवेश बंदी करण्यात आली होती. त्यानंतर आता परत महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे उद्या (ता.१९) येथे महामेळावा आयोजिला आहे. त्याला उपस्थित राहण्यासाठी माने येणार होते. मात्र, त्यांच्यावर प्रवेश बंदीचे आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज (ता.१८) बजाविले आहेत. (Maharashtra-Karnataka dispute)

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सोमवारी (ता.१९) व्हॅक्सीन डेपो येथे महामेळावा आयोजिला आहे. मेळाव्याला कोल्हापूरचे खासदार व महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने उपस्थित राहणार असल्याचे कळविले आहे. कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बेळगावात टिळकवाडीमध्ये व्हॅक्सिन डेपोवर महामेळावा आयोजिला आहे. या महामेळाव्याला महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष माने यांना आमंत्रित केले आहे.

Amit Shah, Eknath Shinde, Basavaraj Bommai
थोरातांनी पुण्यात राष्ट्रवादीचा केला करेक्ट कार्यक्रम; नेता गळाला लावत दिला धक्का

त्यानुसार उद्या बेळगावला येण्याबाबत माने यांनी कळविले असून, कर्नाटक सरकारला दौऱ्याची अधिकृत माहिती कळविले आहे. मात्र, करनाट सरकारने कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याशी शक्यता असल्याचे कारण देत प्रवेशबंदी जारी केली आहे. सीमाप्रश्नावरून बेळगावात अलीकडे निर्माण झालेल्या परिस्थितीचा दाखला, महाराष्ट्रात कर्नाटक बसेसना फासलेले काळे, दौऱ्यामुळे संभाव्य बेळगावातील भाषिक सौहार्दतेला धोका पोचण्याची भिती व कन्नड-मराठी भाषकांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने माने यांना बेळगावात प्रवेशबंदी जारी केल्याचे जिल्हाधिकारी पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कर्नाटकातर्फे निर्बंधचा पायंडा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारतर्फे अलिकडे सीमासमन्वय मंत्री म्हणून चंद्रकांतदादा पाटील, शंभूराजे देसाई यांची निवड केली आहे. या मंत्र्यांसह खासदार धैर्यशिल माने ६ डिसेंबर रोजी बेळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार होते. मात्र, दौऱ्याला आक्षेप घेत प्रवेशबंदीचे आदेश बजावले. याची धूळ खाली बसते न बसते तेच येथे होणाऱ्या महामेळाव्याला येणाऱ्या खासदार माने यांची अडवणूक केली जात आहे. प्रवेश बंदी संदर्भात आदेश जारी बजाविला आहे.

Amit Shah, Eknath Shinde, Basavaraj Bommai
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रात लोकायुक्त कायदा येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी नुकतीच दिल्लीमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. त्या बैठकीला मुख्ममंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर कर्नाटच्या वतीने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते. त्या बैठकीत महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी अमित शाह यांनी मध्यस्ती केली. मात्र, शाह यांनी मध्यस्ती केल्यानंतर सुद्धा कर्नाटकमध्ये जाण्यासाठी खासदार माने यांना बंदी करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com