Sharad Pawar News : काँग्रेसबाबत शरद पवारांचे मोठे विधान ; कर्नाटकमध्ये यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस..

Karnataka Election 2023 : देशभरात भाजपची घसरण सुरु आहे.
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSarkarnama

Karnataka Election 2023 Sharad Pawar ON Congress : कर्नाटकमध्ये येत्या बुधवारी (ता.१० ) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर, १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष यांच्यात प्रमुख लढत होत आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक निवडणुकीबद्दल भाष्य केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

शरद पवार यांनी यांची पहिली जाहीर सभा उद्या (सोमवारी) निपाणी येथे होत आहे . राष्ट्रवादीच्या प्रचाराची जबाबदारी फौजिया खान ,अमोल मिटकरी , रोहित पाटील यांच्यावर आहे. निपाणीतील उत्तम पाटील, गुलबर्गा येथील हरी आर आणि राणेबेन्नूर येथील आर. शंकर या उमेदवारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद पणाला लावली आहे.

Sharad Pawar News
Kapil Sibal : मोदींकडून पुरावे मागणार का ? ; निवडणूक आयोगावर कपिल सिब्बल भडकले ; BJP भष्ट्राचाराचे 'रेट कार्ड..

आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, "कर्नाटकातील स्थानिक नागरिक जनता भाजपवर नाराज आहे. देशभरात भाजपची घसरण सुरु आहे. आगामी निवडणुकांमध्ये केवळ ५ ते ७ राज्यातच भाजपची सत्ता येईल. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येईल,"

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात कर्नाटकमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतवलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना ताकत देण्यासाठी शरद पवार कर्नाटकमध्ये दाखल होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाकटकात नऊ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बेळगावातील निपाणी मतदारसंघात प्रचाराचा शुभारंभ केला तर फौजिया खान, अमोल मिटकरी, हसन मुश्रीफ,आमदार रोहित पवार, रोहित पाटील यांनी सभा घेतल्या.

Sharad Pawar News
Karnataka Election 2023 : मतदानापूर्वीचं काँग्रेसनं मारलं मैदान ; काँग्रेसला 'अच्छे दिन', कर्नाटकातील मोठी वोट बँक...

राष्ट्रवादीने कर्नाटकातही जोरदार प्रचार सुरु केला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आपले उमेदवार देताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी कर्नाटकातील भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटकातील विधानसभेसाठी नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यापैकी चार उमेदवार हे विजयी होणारच असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

अलीकडे सी-व्होटर आणि एबीपी न्यूजचा सर्व्हे समोर आला होता. त्यात सत्ताधारी भाजपाला धक्का बसणार असून, काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकत सत्ता स्थापन करण्याची शक्यता वर्तवली होती. सर्व्हेनुसार, कर्नाटकात काँग्रेसला ११५-१२७ जागा मिळू शकतात. भाजपाला ६८-८० आणि जनता दल धर्मनिरपेक्षला २३-३५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in