कर्मवीर विद्यापीठ जूनपासून सुरू होणार... शरद पवार

रयत शिक्षण संस्थेच्या Rayat Shikshan Sanstha माध्यमातून लाखो विद्यार्थी Students शिक्षण घेत असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या modern technology माध्यमातून शिक्षणाची Educational वाटचाल सुरु आहे.
Karmavir Samadhi Abhivadan
Karmavir Samadhi Abhivadansarkarnama

सातारा : ‘‘सर्वसामान्य कुटुंबियातील विद्यार्थ्यांना कर्मवीर आण्णांनी ज्ञानदानाची संधी दिली. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आण्णांनी लावलेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला असून येत्या जून महिन्यापासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सुरू होईल, अशी घोषणा आज रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी आज साताऱ्यात केली.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६३ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. पवार बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, राज्यमंत्री विश्‍वजित कदम, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, रामशेठ ठाकूर, भगीरथ पाटील, संस्थेचे सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर आदी उपस्थित होते.

Karmavir Samadhi Abhivadan
महाविकास आघाडीची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार ? उद्धव ठाकरे की शरद पवार..

सुरुवातीला श्री. पवार व इतर मान्यवरांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीस अभिवादन केले. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांना ‘इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार’ बीजमाता राहीबाई पोपेरे यांना ‘रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ व माजी मंत्री गणपतराव देशमुख यांना (मरणोत्तर) ‘डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ त्यांच्या पत्नी रतनबाई देशमुख व कुटुंबियांना शरद पवार यांच्या हस्ते मानचिन्ह, अडीच लाखांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.

Karmavir Samadhi Abhivadan
'रयत' बद्दल प्रश्न उपस्थित केला, ही माझी चूक आहे का...

श्री. पवार म्हणाले,‘‘कर्मवारी भाऊराव पाटील यांनी संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व ज्ञानप्राप्ती होण्यासाठी खर्ची घातले आहे. सद्यस्थितीत रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी शिक्षण घेत असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाची वाटचाल सुरु आहे.

Karmavir Samadhi Abhivadan
सातारा जिल्हा बँकेची राष्ट्रीयकृत बँकांशी बरोबरी; सर्व कर्ज व्याजदरात केली कपात

यंदाच्या वर्षी भारतातून परदेशात साखर निर्यातीत महाराष्ट्र एक नंबरला आला असून हा शिक्षित वर्ग संस्थेतून शिकल्याने पुढे कारखानदारी उभी राहिली आहे. तसेच रयत शिक्षण संस्थेचे विद्यापीठ होण्याची ईच्छा कर्मवीर आण्णांची होती. त्यामुळे सस्ंथेला मोठे स्वरुप देण्यासाठी विद्यापीठ स्थापन केले जाणार असून केंद्र व राज्य सरकारने परवानगी दिली असून ईतर प्रक्रिया अंतिम टप्प्यातत आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com