पाण्यावरुन राजकारण पेटले ; आजी- माजी आमदार गटांमध्ये हाणामारी

शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील (Narayan Aba Patil) आणि अपक्ष आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) यांच्या गटातील कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यानंतर आता हा वाद पोलिस ठाण्यात गेला आहे.

पाण्यावरुन राजकारण पेटले ; आजी- माजी आमदार गटांमध्ये हाणामारी
Sanjay Shinde,Narayan Aba Patil sarkarnama

पंढरपूर : पाणी पूजनाच्या कार्यक्रमावरुन करमाळ्याच्या आजी- माजी आमदार गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना नुकतीच घटली असून या वाद आता पोलिस ठाण्यात गेला आहे.

दहिगाव उपसा सिंचन योजनेमधून तलावात सोडलेल्या पाण्याचे पूजन करण्याच्या कारण वरून करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील (Narayan Aba Patil) आणि अपक्ष आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) यांच्या गटातील कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यानंतर आता हा वाद पोलिस ठाण्यात गेला आहे.

देगाव उपसा सिंचन योजनेचे (Degaon Upsa Irrigation Scheme) पाणी करमाळा (Karmala) तालुक्यातील कोंढेज येथील तलावात सोडण्यात आले आहे. या तलावातील पाण्याचे पूजन करण्यासाठी शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या गटाचे कार्यकर्ते गेले असता त्या ठिकाणी आमदार संजय शिंदे यांच्या गटाचे कार्यकर्ते आले तलावात सोडण्यात आले.

Sanjay Shinde,Narayan Aba Patil
'पाहुणे' परतले, अजितदादांशी संबधीत 'आयान'ची तब्बल ७० तास तपासणी

आलेल्या पाण्याच्या श्रेयवादातून ही दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारी मध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात करमाळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Related Stories

No stories found.