कर्जतचे सत्ताकारण : रोहित पवार-राम शिंदे यांच्यातील स्पर्धेचा इंटर्व्हल संपला...

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) व भाजपचे ( BJP ) प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांच्या समर्थकांत लढत आहे.
Ram Shinde
Ram ShindeSarkarnama

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील तीन नगर पंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यात कर्जत नगर पंचायतीचा समावेश आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने तीनही नगर पंचायतींतील प्रत्येकी चार प्रभागांसाठी निवडणूक होत आहे. मागील महिन्यात प्रत्येकी 13 प्रभागांची निवडणूक प्रक्रिया झाली होती. या निवडणुकांत खरी निवडणूक गाजली ती कर्जतची. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar )भाजपचे ( BJP ) प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) यांच्या समर्थकांत लढत आहे. Karjat's reason for power: The interval between Rohit Pawar and Ram Shinde ended ...

या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात 13 प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया झाली. या निवडणूक प्रक्रियेत भाजप उमेदवार राष्ट्रवादीच्या गोटात जाताना दिसून आले. यावर भाजपने आमदार रोहित पवार यांच्यावर दहशतीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. राम शिंदे यांनी कर्जतचे ग्रामदैवत गोदड महाराज मंदिरासमोर मौन आंदोलन केले. तसेच राज्य निवडणूक आयोग व न्यायालयाकडे तक्रार केली होती. त्यामुळे ही निवडणूक राज्यभर गाजली.

Ram Shinde
ही तर राम शिंदे यांची स्टंटबाजी : रोहित पवारांचा पलटवार

सुमारे 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर निवडणुकीची रणधुमाळी पुन्हा सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात ज्या गोदड महाराजांच्या मंदिरा समोर आंदोलन झाले होते. त्याच गोदड महाराज मंदिरात राम शिंदे यांनी प्रवेश करून भाजपच्या प्रचाराचा नारळ वाढविला. त्यामुळे कर्जत नगर पंचायत निवडणुकीचा इंटरव्हल संपला आहे. भाजपने आपली प्रचार यंत्रणा पुन्हा कामाला लावली आहे.

Ram Shinde
नगरपालिका निवडणुकीत कर्जतमध्ये राजकीय नाट्य आणि राम शिंदे संतापले; पाहा व्हिडिओ

कर्जत नगरपंचायतीच्या उर्वरित चार प्रभागाच्या निवडणुकीचा आज गोदड महाराज मंदिरात राम शिंदे तसेच जिल्हा बँकेचे संचालक आंबदास पिसाळ निरीक्षक बाळासाहेब महाडिक, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, अशोक खेडकर, अरविंद काळोखे, तालुका अध्यक्ष डॉ. सुनील गावडे यांच्या हस्ते प्रचाराचा श्रीफळ वाढवून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी भाजपचे अधिकृत उमेदवार वंदना वाघमारे, रावसाहेब खराडे, सारिका क्षीरसागर व दादासाहेब सोनमाळी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com