Karjat Jamkhed : कर्जत-जामखेडमधून कोण येणार? रोहित पवार की राम शिंदे? कार्यकर्त्यांनी लावली एका लाखाची पैज!

Karjat Jamkhed : एक लाखाचे चेक आताच जमा केले आहेत.
Ram shinde and rohit pawar Latest News
Ram shinde and rohit pawar Latest NewsSarkarnama

Ahmednagar News : महाराष्ट्राची पुढची विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये होणार आहे. मात्र या निवडणुकांना बराच अवकाश असताना, आताच कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकींबाबत कमालीचा उत्साह संचारला आहे. आगामी विधावसभेला कर्जत-जामखेड मतदारसंघातून कोण बाजी मारणार, याबाबत दावे प्रतिदावे केले जात आहेत. तर, या मतदारसंघातून कोण निवडून येणार या प्रश्नावरून दोन कार्यकर्त्यांमध्ये तब्बल एक लाख रुपयांची पैज लागली आहे.

2024 साली कर्जत -जामखेड मतदारसंघातून कोण जिंकणार? भाजपचे राम शिंदे (Ram Shinde ) निवडून येणार की, राष्ट्रवादीचे रोहित पवार (Rohit Pawar) पुन्हा एकदा बाजी मारणार हा प्रश्न कार्यकर्त्यांना भेडसावत आहे. तर आता या प्रश्नावरून दोन कार्यकर्त्यांमध्ये तब्बल एक लाखांची पैज लागली आहे. संपूर्ण कर्जत-जामखेड मतदार संघात या पैंजेची एकच चर्चा सुरू झाली आहे.

Ram shinde and rohit pawar Latest News
Dhnanjay Munde : एक रुपयात पेन्सील तरी मिळते का ? प्रतिदिन अनुदान २० रुपये करा

कार्यकर्त्यांमध्ये लागली एक लाखाची पैज :

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड हा मतदार संघ राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. इथून भाजपचे दिग्गज नेते व माजी मंत्री राहिलेले राम शिंदे व राष्ट्रवादीकडून पवार घराण्यातील विद्यमान आमदार रोहित पवार दोघेही आमने-सामने आहेत. २०२४ ला येथून नेमकं कोण निवडून येणार ? रोहित पवार की राम शिंदे, यावरून पैज लागली आहे. रोहित पवार यांचे कट्ट्र समर्थक विशाल डोळे आणि राम शिंदे यांचे समर्थक जायभाये यांच्यात हा एक लाखाची पैज लागली आहे.

Ram shinde and rohit pawar Latest News
CM News : अजित पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हे जनता खपवून घेणार नाही...

पैज लावताना या दोघांनीही विष्णू जायभाय या मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीकडे एक लाखाचे चेक जमा केले आहे. निवडणुकीला अजूनही एक वर्षापेक्षा जास्त अवकाश असताना, कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र शिगेला पोहोचला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in