कर्डिले-गाडे राजकीय संघर्षाचे वाजू लागले नगारे

नगर तालुक्यात भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) व शिवसेनेचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे ( Shashikant Gade ) यांच्यात राजकीय संघर्ष जुना आहे.
Shashikant Gade & Shivaji Kardile
Shashikant Gade & Shivaji KardileSarkarnama

अहमदनगर - नगर तालुक्यात भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) व शिवसेनेचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे ( Shashikant Gade ) यांच्यात राजकीय संघर्ष जुना आहे. महाविकास आघाडीने कर्डिले यांच्या ताब्यात असलेल्या नगर तालुका बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करत प्रशासक नियुक्त केल्याने या संघर्षाला आणखी धार चढली आहे. अशातच विविध कार्यकारी सोसायट्यांच्या निवडणुका सुरू आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येऊ घातल्याने कर्डिले-गाडे राजकीय संघर्षाचे युद्ध नगारे वाजू लागले आहेत. ( Kardille-Gade political struggle began )

नगर तालुक्याच्या राजकारणातील मातब्बर समजले जाणारे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचा जेऊर गट बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या परिसरातील सेवा सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकांत या वेळी तालुका महाआघाडीने कर्डिले गटाला गावागावांत कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे निवडणुकांमधील चुरस चांगलीच वाढली आहे. या सोसायट्यांच्या निवडणुकांमध्ये कोणता गट बाजी मारतो, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Shashikant Gade & Shivaji Kardile
नगर तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करा - शिवाजी कर्डिले

जेऊर, धनगरवाडी बहीरवाडी, इमामपूर या गावांमधील सेवा सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यातील धनगरवाडी सोसायटी बिनविरोध झाली आहे. जेऊर, बहीरवाडी, इमामपूर या गावांतील सोसायट्यांत कर्डिले गटाचे सुमारे दहा ते पंधरा वर्षांपासून वर्चस्व आहे. महाविकास आघाडीने जेऊर, इमामपूर, बहीरवाडी येथे कर्डिले गटासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. त्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे तसेच ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे पाठबळ मिळत असल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे.

बहीरवाडीत येथे तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. दहा जागांसाठी तीन मार्च रोजी मतदान होणार आहे. इमामपूर गावात 450 सभासद मतदार असून, येथे 13 जागांसाठी दोन मार्च रोजी मतदान होणार आहे. इमामपूर येथून कर्डिले गटाकडून गणेश आवारे निवडणुकीत उतरले असून, येथील निवडणूक चुरशीची होणार आहे. इमामपूर येथे कर्डिले गटाचीच सत्ता होती. डोंगरगण सोसायटीमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली आहे.

Shashikant Gade & Shivaji Kardile
शशिकांत गाडे म्हणाले, नगर तालुका बाजार समितीचा भ्रष्टाचार जनतेसमोर आणा

जेऊर सेवा सोसायटीत 950 सभासद मतदार असून, तेथे 13 मार्च रोजी मतदान होणार आहे. पंधरा वर्षांपासून सोसायटीत कर्डिले गटाची सत्ता आहे. यावेळी महाविकास आघाडीने कर्डिले गटासमोर आव्हान उभे केले आहे. माजी आमदार कर्डिले यांचा हक्काच्या समजल्या जाणाऱ्या जेऊर गटातील सेवा संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठे आव्हान उभे केल्याने येथील निवडणूक चुरशीच्या ठरणार आहेत.

Shashikant Gade & Shivaji Kardile
दुधवाला शिवा असा झाला सरपंच ! जुन्या आठवणीत रमले शिवाजी कर्डिले

आम्ही तुमचेच!

सेवा सोसायट्या व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ता नेमकी कोणत्या गटाला मिळेल, हादेखील कळीचा मुद्दा बनला आहे. या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार निवडणुकीतील दोन्ही गटांचे सत्कार स्वीकारत ‘आम्ही तुमचेच’ असे सांगत असल्याने, ते नेमके कोणाचे, हेच जनतेला कळत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in