कर्डिलेंचे लक्ष दरेवाडी, वाळकी गटांवर

जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील गटांचे व गणांचे दोन दिवसांपूर्वी आरक्षण काढले.
Shashikant Gade & Shivaji Kardile
Shashikant Gade & Shivaji KardileSarkarnama

अहमदनगर - जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील गटांचे व गणांचे दोन दिवसांपूर्वी आरक्षण काढले. या आरक्षणामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणांची राजकीय गणिते बदलली यात नगर तालुक्याचाही समावेश आहे. नगर तालुक्यात महाविकास आघाडीसमोर भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) यांचे मोठे आव्हान आहे. मात्र आरक्षण सोडतीमुळे या लढतीला नवीन दिशा मिळाली आहे. ( Kardile's focus on Darewadi, Valki groups )

नगर तालुक्यातील दरेवाडी व वाळकी जिल्हा परिषद गट खुले राहिले आहेत. त्यामुळे तालुक्यात भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले व महाविकास आघाडीचे व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्यातील पारंपरिक राजकीय द्वंद्व पुन्हा एकदा या दोन्ही गटांत पाहावयास मिळणार आहे.

Shashikant Gade & Shivaji Kardile
शिवाजी कर्डिले म्हणाले, राम शिंदेंना विधान परिषदेचे आमदार करा...

माजी मंत्री कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून जेऊर व नागरदेवळे या दोन्ही गटांत गेल्या तीन वर्षांपासून संपर्क व गाठीभेटींवर जोर दिला होता, मात्र आरक्षण सोडतीत जेऊर गट सर्वसाधारण महिलांसाठी, तर नागरदेवळे गट नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाला. त्यामुळे अक्षय कर्डिले यांनी आता दरेवाडी व वाळकी या गटांसाठी प्रयत्न सुरू केले आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे.

जिल्हा परिषदेत नगर तालुक्यात चिचोंडी पाटील या एका गटाची नव्याने निर्मिती झाली आहे. पूर्वी चिचोंडी पाटील गणातील अनेक गावे दरेवाडी गटात होती. या गटाचे जिल्हा परिषद सदस्य राहिलेले शिवसेनेचे संदेश कार्ले दरेवाडी गटातून पुन्हा नशीब अजमावत आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या दोघांनीही दरेवाडी गटातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटींवर जोर दिला आहे.

Shashikant Gade & Shivaji Kardile
अक्षय कर्डिलेंची मोठी घोषणा : राजकारणाचा नवा डाव ठरला

वाळकी गटाचे गेली पंधरा वर्षे बाळासाहेब हराळ व त्यांच्या पत्नी अनिता हराळ यांनी जिल्हा परिषदेत नेतृत्व केले आहे. सन २०२२ मध्ये हा गट खुला असल्याने त्यांनी आपल्या जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांची नव्याने मोट बांधून गटातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. दरम्यान, तालुक्यातील लग्न, साखरपुडा, वाढदिवस, दशक्रिया विधी, अंत्यविधी आदी कार्यक्रमांना इच्छुकांसह त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com