कऱ्हाडला तहसीलदारांसह एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

कऱ्हाड तालुक्यात Karad taluka या आठवड्यात कोविड बाधित Covid positive रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे तालुक्याची चिंता वाढली आहे.
कऱ्हाडला तहसीलदारांसह एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण
Tashil office , karadkarad reporter

कऱ्हाड : कोविडचा संसर्ग सध्या कऱ्हाडला वाढु लागला आहे. त्यामुळे तालुक्याची चिंता वाढली आहे. त्यातच सध्या तालुक्याचे तहसीलदारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या कार्यालयातील एक कर्मचारीही बाधित आला आहे. त्यामुळे तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे.

कऱ्हाड तालुक्यात या आठवड्यात कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे तालुक्याची चिंता वाढली आहे. त्याचा विचार करुन आरोग्य विभागाने आवश्यक त्या उपाय योजना राबवण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी तहसिलदार विजय पवार हे कार्यरत आहेत. ही यंत्रणा राबवताना त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या कार्यालयातील एक कर्मचारीही बाधित आढळला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे.

Tashil office , karad
सातारा झेडपीचे सीईओ गौडा दांपत्याला कोरोनाची लागण

कराड शहरातील नागरी आरोग्य केंद्राच्यावतीने आज कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या चाचण्यांचा काय अहवाल येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, तालुक्यातील नागरिकांनी कोरोना नियमांचे व प्रशासनाच्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करावे, आरोग्याबाबत थोडी जरी शंका आल्यास संबंधितांनी तात्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. प्रशासनाचे नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन तहसिलदार पवार यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in