आएएनएस वागशीर पाणबुडीला कराडची यंत्रणा; आर. जी. शेंडेंना मिळाला मान

श्री. शेंडे R. G. Shende म्हणाले, ''गेली दहा वर्षे Ten Years मी माझ्या श्री रेफ्रीजेशनच्या Refrigarator माध्यमातुन सैन्यदलासाठी Army काम करत आहे.
R.G. Shende, INS Wagshir
R.G. Shende, INS Wagshirsarkarnama

कऱ्हाड : भारतीय सैन्यदलात आयएनएस वागशीर ही पाणबुडी आज रक्षा सचिव डॉ. अजयकुमार यांच्या हस्ते दाखल होत आहे. त्यामुळे सैन्यदलाची ताकद वाढणार आहे. या पाणबुडीसाठी लागणारी वातानुकुलीत यंत्रणा येथील श्री रेफ्रीजरेशनचे आर. जी. शेंडे यांनी तयार करुन दिली आहे. त्यामुळे कऱ्हाडचा नावलौकीक जागतिक पातळीवर पोहोचला आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

भारतीय मेक इन इंडीया अंतर्गत ही पाणबुडी तयार करण्यात आली आहे. ही पाणबुडी समुद्रावरुन हवेत, जमीनीवर आणि समुद्रात गस्त घालताना गुप्तहेरगीचेही काम करणार आहे. युध्दातही ही पाणबुडी महत्वाची ठरणार आहे. समुद्रात देखभाल करण्यासही ती सक्षम ठऱणार आहे. आज दुपारी तीचे उद्‍घाटन रक्षा सचिव यांच्या हस्ते होणार आहे. तिची लांबी २२१ फुट असुन ती ४० टक्के भारतीय बनावटीची आहे. तीचे उद्घाटन झाल्यानंतर आज समुद्रात ती सोडण्यात येईल.

R.G. Shende, INS Wagshir
सत्ताधाऱ्यांना विचारायला हवे, किती मंत्र्यांची मुले सैन्य दलात भरती होतात? 

तीचे वर्षभर टेस्टींग करण्यात येणार आहे. या पाणबुडीत कऱ्हाडच्या श्री रेफ्रीजरेशनचे आर. जी. शेंडे यांनी तयार केलेली वाताणुकुलीत यंत्रणा वापरण्यात आली आहे. त्याबद्दल माहिती देताना श्री. शेंडे म्हणाले, ''गेली दहा वर्षे मी माझ्या श्री रेफ्रीजेशनच्या माध्यमातुन सैन्यदलासाठी काम करत आहे. यापुर्वी पाणबुडीसाठी फ्रेंच कंपनीची वातानुकुलीत यंत्रणा वापरली जात होती. सध्या मेक इन इंडीया अंतर्गत तयार केलेल्या आयएनस वागशीर पाणबुडी ही भारतीय बनावटीच्या माध्यमातुन तयार करण्यात आली आहे.''

R.G. Shende, INS Wagshir
Video: शेतमालाची विक्री सामुदायिक पद्धतीने व्हायला हवी; शरद पवार

''मध्यंतरी जहाज बांधणी होत असलेल्या माझगाव डॉकचे पाणबुडीसाठीतील वातानुकुलीत यंत्रणेसाठीचे एक टेंडर निघाले होते. पहिले ते फ्रेंच कंपनीचे यंत्रणा वापरत होते. मात्र, भारतीय बनावटीची नवीन पाणबुडी करायची असल्याने मी श्री. रेफ्रीजरेशनचे टेंडर भरले होते. त्याचबरोबर भारतातील व अनेक पदरेशी कंपन्यांनाही ते टेंडर भरले होते. मात्र सर्व परदेशी कंपन्यांच्या टेंडरमध्ये श्री रेफ्रीजरेशनने बाजी मारुन ते टेंडर घेतले. त्यानंतर त्याचा दर्जा तपासल्यानंतर माझगाव डॉकने ते मंजुर केले.''

R.G. Shende, INS Wagshir
खासदार रक्षा खडसे म्हणाल्या, धन्यवाद मोदीजी!

त्यानंतर काम सुरु झाले. दोन वर्षे ती कार्यवाही सुरु होती. त्यासाठी मला पत्नी राजश्री शेंडे आणि श्री रेफ्रिजरेशनचे संपुर्ण कर्मचारी यांची सहकार्य लाभले. आज त्या पाणबुडीचे रक्षा सचीव डॉ. अजयकुमार यांच्या हस्ते उद्घाटन होवुन ती सैन्यदलाच्या ताफ्यात दाखल होत आहे. मला भारतीय सैन्यदलाच्या पाणबुडीचा एक हिस्सा होता आले याचे मी भाग्य समजतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com