Karad : वाढीव पाणीपट्टीवरून नागरीक आक्रमक; कृष्णा नदीत जलसमाधीचा प्रयत्न

Water Bill पाणीपट्टीची आकारणी पूर्वीच्या वार्षिक आकारणी प्रमाणेच करण्याच्या मागणीसाठी कृष्णेच्या पात्रात लक्षवेधी आंदोलन झाले.
Karad Andolan
Karad Andolansarkarnama

Karad News : कराड शहरात Karad City मीटरप्रमाणे केलेल्या पाणीपट्टीच्या आकरणीला विरोध वाढत असून आज विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी कृष्णा नदीच्या पात्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी Police हस्तक्षेप करून संबंधितांना अडवले. भीम आर्मी, समता सामाजिक संघटना व मानव कल्याणकारी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

चोवीस तास पाणी योजनातंर्गत सुरू असलेल्या पाणीपट्टी विरोधात विविध संघटनांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासह पाणीपट्टीची आकारणी पूर्वीच्या वार्षिक आकारणी प्रमाणेच करण्याच्या मागणीसाठी कृष्णेच्या पात्रात लक्षवेधी आंदोलन झाले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की शहरातील वाढीव पाणी बिले संदर्भात नागरिकांसह विविध संघटना व राजकीय पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिली आहेत चोवीस तास पाणी योजना पूर्ण झालेली नसताना मीटर प्रमाणे पाणीपट्टीची बिले दिली आहेत. सध्या केलेली दर आकारणी अन्यायकारक आहे, ती रद्द करुन पूर्वीप्रमाणे वार्षिक बिले देण्यात यावीत व चोवीस तास पाणी योजना पूर्ण झाल्यानंतर बिलांची आकारणी करण्यात यावी.

Karad Andolan
Karad : लव्ह जिहादच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा भव्य मोर्चा...

अन्यथा, कराड शहरांमध्ये जनआंदोलन उभे केले जाईल, त्याची सर्व जबाबदारी पालिकेची राहिल. निवेदनावर जावेद नायकवडी, सलीम पटेल, आनंदराव लादे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मुख्याधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आले आहेत.

Karad Andolan
Karad : सरपंचाचं लग्न ठरेना; मग काय, थेट केंद्रीय मंत्र्यांनाच घातले साकडे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com