स्वच्छ सर्वेक्षणात कराड, पाचगणी देशात अव्वल; सात शहरांना 'थ्री स्टार' रॅकिंग

जिल्ह्यातील सातारा satara, मलकापूर Malkapur, महाबळेश्वर Mahabaleshwar, पाचगणी Panchgani, वाई wai, रहिमतपूर Rahimatpur, कराड karad या सात Seven cities शहरांनादेखील कचरामुक्त शहरे (GFC) चे तीन स्टार रँकिंग three star ranking प्राप्त झाले आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात कराड, पाचगणी देशात अव्वल; 
 सात शहरांना 'थ्री स्टार' रॅकिंग
karad palika, Panchgani palikasakal reporter

सातारा : केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण आणि कचरामुक्त शहरे या सर्वेक्षणात जिल्ह्यातील कराड आणि पाचगणी या शहरांना देशपातळीवर पुरस्कार जाहीर झाला आहे. उद्या (शनिवार) नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

जिल्ह्यातील सातारा, मलकापूर, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, रहिमतपूर, कराड या सात शहरांनादेखील कचरा मुक्त शहरे (GFC) चे तीन स्टार रँकिंग प्राप्त झाले आहे. यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाद्वारे या शहरांना पुरस्कृत करण्यात येणार आहे. या यशाबद्दल जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नगर परिषदांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

karad palika, Panchgani palika
स्वच्छ मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराजबाबांचे नाव अग्रक्रमाने पुढे येईल : शंभूराज देसाई 

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कराड व पाचगणी शहरात घरगुती कचरा हा वेगळा केला जातो. ओला, सुका, घातक आणि प्लास्टिक तसेच घातक व सॅनिटरी कचरा, ई कचरा विलगीकृत घेतला जातो. कचरा विलागिकरणाचे प्रमाण हे 100 टक्के आहे. शहरातील नागरिक हे स्वत:ही घरचे घरी किचन वेस्ट पासून खत तयार करतात. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नगरपरिषदेमार्फत घरोघरी जाऊन वर्गीकरण केलेला ओला व सुका कचरा 100 टक्के संकलित केला जातो.

karad palika, Panchgani palika
जिल्हा बँक निवडणूक; कराड, पाटणच्या दोन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

प्लॉस्टिक बंदीबाबत प्रभावी अंमलबजावणी करताना नागरिकांना पुर्नवापर योग्य कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरातील जुन्या कचऱ्यावर 100 टक्के शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाते. नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध मोहिमा राबविण्यात आल्या. नगरपरिषदेमार्फत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाते. तसेच शासनाच्या ‘हरित ब्रॅण्ड’ अंतर्गत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in