Karad : कराडच्या कार्यक्रमाला अजित पवारांना निमंत्रणच नाही; राष्ट्रवादीने केला निषेध

Eknath Shinde मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात कोणत्याही आमदाराला MLA विश्वासात न घेता उद्घाटनाचा घाट घातला आहे.
Ajit Pawar, Eknath Shinde
Ajit Pawar, Eknath Shindesarkarnama

कऱ्हाड : कराड शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीच्या उभारणीत मोलाचे योगदान असणाऱ्या तत्कालीन उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निमंत्रित केलेले नाही. त्यांचा नामोल्लेखही टाळण्यात आला आहे. त्याचा निषेध राष्ट्रवादी कॉग्रेस कऱ्हाड तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केला आहे.

श्री. यादव यांनी पत्रकात म्हटले की, येथील शासकीय विश्रामगृह उभारण्यात व त्याला निधी देण्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांनी योगदान दिले आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांची उद्या (शुक्रवारी) पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच येत आहेत. त्यांच्या हस्ते विश्रामगृहाचे उद्घाटन आहे, तो कार्यक्रम आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आयोजित केला आहे.

वास्तविक कार्यक्रमाच्या नियोजनात अजितदादा यांचा उल्लेख नसणे चुकीचे आहे. शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य सरकार असे म्हणणाऱ्या कॉग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याच मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन करणे चुकीचे आहे. राज्यात आजही महाविकास आघाडी अस्तित्वात आहे. असे असताना चुकीच्या पध्दतीने कार्यक्रम करणे निषेधार्थ आहे. येथील विश्रामगृहाला अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री असताना निधी मिळाला आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde
Karad : पृथ्वीराज चव्हाणांच्या विकास कामांचे एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार उद्‍घाटन 

अजितदादांनी वेळोवेळी विश्रामगृहाचे काम सुरू असताना दोन वेळेला विश्रामगृहाची पाहणी केली आहे. 25 नोव्हेंबरला ज्येष्ठ नेते चव्हाण स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री स्मृतीस्थळावर येऊन आदर व्यक्त करतात. त्या प्रमाणे उद्याही मुख्यमंत्री शिंदे येत आहेत, त्या दौऱ्यातच जिल्ह्यातील कोणत्याही आमदाराला विश्वासात न घेता उद्घाटनाचा घाट घातला आहे. माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे. मात्र त्यात मोलाचे योगदान असणाऱ्या अजित पवार यांना निमंत्रित न केल्यामुळे संबंधित घटनेचा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या तालुका व जिल्ह्यातील कायर्कर्त्यांतर्फे निषेध आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde
सीमाप्रश्नी मंत्र्यांची समिती नेमताच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिला एकनाथ शिंदेंना हा अनाहूत सल्ला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com