Rohit Patil |Prabhakar Patil
Rohit Patil |Prabhakar PatilSarkarnama

Sangali Politics : सांगलीत आबा-काकानंतर ज्युनिअर पाटलांच्या राजकीय संघर्षाला सुरुवात

या दोघांकडेही भावी आमदार म्हणून पहिले जात असताना जुना संघर्ष आता नवी पिढीही पुढे घेऊन जात असल्याचे दिसत आहे.

Sangali Politics : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील आणि भाजप खासदार संजय पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत होता. पण आता त्यांच्या दसऱ्या पिढीच्याही राजकीय संघर्षाला सुरुवात झाल्याचे दिसत आहे.

आर.आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील आणि संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांच्यातही नवा राजकीय संघर्ष सुरु झाला असून दोघांनीही जाहीर कार्यक्रमात एकमेकांना थेट इशारे द्यायला सुरुवात केली आहे.

Rohit Patil |Prabhakar Patil
ABVP Vs SFI : मोदींवरील डॉक्युमेंट्रीला ABVP चे सडेतोड उत्तर ; 'द काश्मीर फाइल्स'..

विशेष म्हणजे खासदार संजय पाटील यांनी आपण आपल्या मुलाला राजकारणात आणणार नसल्याचं जाहीर केलं होतं. पण काही दिवसांपुर्वीच त्यांनी त्यांच्या मुलाला प्रभाकरला राजकारणात लॉन्च केलं. त्यामुळे आता सांगलीच्या राजकारण दोन सिनिअर पाटलांमधील संघर्षानंतर आता भविष्यात ज्युनिअर पाटलांमधील संघर्षही पाहायला मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वी नागझ येथील एका सभेत बोलताना, गुंडगिरी करणाऱ्या विरोधकांना घरातून बाहेर पडून देणार नाही, असा इशाराच प्रभाकर पाटील यांनी दिला होता. त्यावर 'कुणी घराबाहेर पडू देणार नाही, असं म्हणत असतील तर आम्हीदेखील बांगड्या भरलेल्या नाहीत, अशा शब्दांत रोहित पाटील यांनी प्रभाकर पाटलांच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिलं आहे. या दोघांकडेही भावी आमदार म्हणून पहिले जात असताना जुना संघर्ष आता नवी पिढीही पुढे घेऊन जात असल्याचे दिसत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार मानले जातात. आताच त्यांच्या कार्यकर्त्यांकडून रोहित पाटील यांचा भावी आमदार असा उल्लेख होऊ लागला आहे. तर खासदार समर्थकांकडून प्रभाकर पाटील यांच्याकडेही भावी आमदार म्हणून पाहिले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in