प्राजक्त तनपुरे आणि जयंत पाटील यांची विकासात्मक बाबींवर जुगलबंदी रंगली

अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष ( NCP ) संघटन मजबूत करण्यासाठी जयंत पाटील ( Jayant Patil ) हे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा करत आहेत.
Jayant Patil & Prajakt Tanpure
Jayant Patil & Prajakt TanpureSarkarnama

राहुरी : अहमदनगर जिल्ह्यात विधान परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था आदींच्या निवडणुका जवळ आले आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अहमदनगर जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जयंत पाटील हे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा करत आहेत. या निमित्त त्यांनी आज (गुरुवारी) राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.

राहुरीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यात विकासात्मक बाबींवर चांगलीच जुगलबंदी पहायला मिळाली. "तुमच्या सगळ्या मागण्या मान्य आहेत. पण, माझीही मागणी आहे. आमच्या इस्लामपूर, आष्टा नगरपालिकेला नगरविकास खात्यातर्फे निधी उपलब्ध करून द्यावा. राहुरी मतदारसंघात 200 रोहित्र बसविले आहेत. आमच्या भागाकडेही लक्ष असूद्या." अशी मिश्किली मंत्री पाटील यांनी केली.

Jayant Patil & Prajakt Tanpure
मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तरूणांना दिली ही आनंदाची बातमी...

पक्षाची आढावा बैठक घेत असतांना दोन मंत्र्यांमध्ये रंगलेली ही जुंगलबंदी पाहून संपूर्ण सभागृहात हशा पिकला. मंत्री जयंत पाटील यांच्या ज्येष्ठ भगिनी व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मातोश्री डॉ. उषा तनपुरे, युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रेरणा मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश वाबळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, नगराध्यक्ष अनिल कासार, शहराध्यक्ष संतोष आघाव, रोहिदास कर्डिले, महिला तालुकाध्यक्ष शारदा खुळे, युवक तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ, शहर महिलाध्यक्ष अपर्णा ढमाळ उपस्थित होते.

मंत्री तनपुरे यांनी मतदार संघातील वांबोरी चारी टप्पा-दोन, मुळा धरणावरील पूल, धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम, निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे आदींसाठी निधीची मागणी केली. त्यावर, मंत्री पाटील यांनी तुमची सगळी कामे मंजूर करतो. निधीची तरतूद करतो. परंतु, आमच्या इस्लामपूर, आष्टा नगरपालिकेला तुम्ही निधी द्यावा. राहुरी संघासारखे रोहित्र, वीज उपकेंद्र द्यावेत. अशी मागणी करून, मंत्री तनपुरे यांची फिरकी घेतली.

Jayant Patil & Prajakt Tanpure
विखेंनी लसीकरण केंद्रावर फ्लेक्स बोर्डपेक्षा मंडप लावावे - प्राजक्त तनपुरे

मंत्री पाटील म्हणाले, "भाजपा सरकारच्या काळात निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे संथ गतीने चालू होती. महाविकास आघाडी सरकारने निळवंडेच्या कालव्यांसाठी 545 कोटी मंजूर केले. त्यामुळे, कालव्यांची कामे वेगाने सुरू आहेत. कोरोना संकटात निधीला कात्री लागली. तरी, यावर्षी 500 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला जाईल. पुढील दोन वर्षे प्रत्येक वर्षी सातशे कोटींची तरतूद केली जाईल. 2024 पर्यंत या प्रकल्पाच्या कालव्याची कामे पूर्ण करून या भागातील सिंचन क्षमतेत वाढ केली जाईल."

जयंत पाटील पुढे म्हणाले, "मुळा धरणाच्या पलीकडील गावांच्या नागरिकांची धरणातून बोटीच्या जीवघेण्या जलप्रवासातून मुक्तता करण्यासाठी धरणाच्या पाण्यावरील पुलाच्या कामाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या पुलासाठी कितीही खर्च आला. तरी, पुलाच्या कामाला मंजुरी दिली जाईल. या पुलाला नियामक मंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. तसेच जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग 50-50 टक्के खर्च करून हा पूल पूर्ण करणार आहे."

Jayant Patil & Prajakt Tanpure
जयंत पाटील यांच्या दौऱ्याने वाढली मोनिका राजळेंसमोरील समस्या

"माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी देसवंडी येथे मुळा नदीवर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या कामाची मागणी केली आहे. तेथे पाणी उपलब्धतेचा दाखला घेऊन, लवकरच बंधाऱ्याच्या कामास मंजुरी दिली जाईल. मुळा धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी पाच कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. या कामासही लवकरच मंजुरी दिली जाईल."

"विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याने प्राजक्त तनपुरे यांचा दैदिप्यमान विजय झाला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी त्यांना मंत्रिमंडळात संधी दिली. सहा खात्यांचे राज्यमंत्रीपद दिले. त्यांचे काम चांगले आहे. त्यांना मतदारसंघाबाहेर जास्त वेळ देण्यासाठी मतदार संघातील पक्षसंघटना मजबूत असणे गरजेचे आहे. प्राजक्त तनपुरे यांना परभणी, अकोला जिल्ह्यातून संपर्कमंत्री करा. अशी मागणी होत आहे. त्यांना मतदार संघात गुंतवून ठेवू नका." असेही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

प्राजक्तदादा माझंही तुमच्याकडे काम आहे... तुमच्या मागण्या मान्य केल्या. आता आमच्या निधीचाही विचार करा. असे म्हणत जयंत पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांना गुगली टाकली. "आमच्या इस्लामपूर, आष्टा नगरपालिकेला नगरविकास राज्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून द्यावा." अशी मागणी त्यांनी केली. "राहुरी मतदारसंघात जवळपास 200 ट्रान्सफॉर्मर्स बसवले आहेत. आमच्या भागाकडेही लक्ष असू द्या." अशी मिश्किली जयंत पाटील यांनी केली.

राहुरीतील या 'परिवार' संवादात दोन मंत्र्यांमध्ये रंगलेली ही जुंगलबंदी पाहून संपूर्ण सभागृहात हशा पिकला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com