
Jaykumar Gore Accident : भाजपचे आमदार जयकुमार गोरे (MLA Jayakumar Gore) यांचे गंभीर वाहन अपघात झाले होते. सातारा जिल्ह्यातील फलटण (Phalatan) येथील मलठण (Malthan) पुलावरून ३० फूट खाली कोसळून त्यांचा वाहनाचा अपघात झाला. या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. मात्र जयकुमार गोरे यांच्या छातीला मार लागल्याचे समजत आहे. आता गोरे यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांचे बंधू अंकुश गोरे आणि त्यांच्या परिवाराच्या सदस्यांकडून सांगण्यात आले आहे. मात्र हा अपघात घडल्यावर गोरे यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत काही महत्त्वाचे फोन केल्यामुळे, वाहनामध्ये त्यांच्या सोबत असलेल्या सर्वांनाच त्यांनी मृत्यूच्या दारातून बाहेर काढले.
अपघातानंतर उपचारासाठी गोरे यांना पुणे येथील रूबी हॉल रूग्णालयात दाखल करण्यात आले. जयकुमार गोरे यांना भेटण्यासाठी भाजपचे नेते आणि माढाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर सगळ्यात आधी अपघातच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनीच आमदार गोरे यांना रुग्णालयात दाखल केलं.
आज पहाटे तीनच्या सुमारास माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे मुंबईवरून माणकडे रवाना झाले होते. यावेळी फलटण जवळील मलठण गावातल्या पुलावर त्यांचा भीषण अपघात झाला. त्यांच्या चालकाचा वाहनावरील ताबा नियंत्रणात न राहिल्याने, वाहन पुलाच्या कठड्याला धडकले. कठडा तोडून वाहन थेट ३० फूट खाली कोसळले. या अपघातात जयकुमार गोरेसोंबतच त्यांचे इतर तीन सहकारी जखमी झाले.
संकटातही धीर आणि संयम दाखवणारे आमदार :
भीषण अपघात होऊनही आमदार जयकुमार गोरे लटपटले नाही. यावेळी त्याने धीराने आणि संयमाने परिस्थितीचा सामना केला. स्वत: जखमी असतानाही, त्यांनी आपल्या सोबतच्यासहकाऱ्यांना धीर दिला. यानंतर त्यांनीसर्वात आधी सुशांत निंबाळकर आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना फोन करुन संपर्क केला. अपघाताची माहिती दिली.
एवढ्या पहाटेच आलेल्या फोनने सुशांत निंबाळकर आणि रणजितसिंह निंबाळकर यांनीही घटनेचं गांभीर्य़ लक्षात घेऊन अपघाताच्या ठिकाणी रवाना झाले. अपघातील सर्व जखमींना गाडीतून बाहेर काढत आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं
वेळीच प्रसंगावधान दाखवत जयकुमार गोरे यांनी संपर्क साधल्यामुळे स्वत:ला आणि त्यांचा सहकांऱ्याना वेळीच उपचार घेता आले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.