"मी, जयश्री चंद्रकांत जाधव...." : कोल्हापुरच्या पहिल्या महिला आमदार विधानसभेत शपथबद्ध

Jayshree Jadhav | जयश्री जाधव कोल्हापूरच्या पहिल्या महिला आमदार
Jayshree Jadhav
Jayshree JadhavFacebook

कोल्हापूर : "मी जयश्री चंद्रकांत जाधव शपथ घेते की..." अशा शब्दात कोल्हापुरच्या पहिल्या महिला आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी आज विधानसभेत आमदारकीची शपथ घेतली. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील उपस्थित होते.

यानंतर बोलताना जयश्री जाधव म्हणाल्या, माझे पती दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांच्यानंतर कोल्हापुरातील जनतेची सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांचा मी मनःपूर्वक आभारी आहे. या शपथेसोबतच माझ्यावर असलेल्या जबाबदारीची मला पूर्ण जाणीव असून पुढील काळात आपल्या विश्वासाला पात्र ठरण्याचे काम माझ्या हातून होईल याची मी ग्वाही देते, अशा शब्दात प्रतिक्रिया दिली.

Jayshree Jadhav
पटेल-पटोले वाद दिल्लीत जाणार! राष्ट्रवादी-भाजप संबंध उघडे पाडण्याचा काँग्रेसचा इशारा

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे गतवर्षी निधन झाले होते. त्यानंतर झालेल्या कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत (Kolhapur North Poll Bye Election) काँग्रेसच्या (Congress) उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव (Jayshree Jadhav) यांनी तब्बल १८ हजार ९०१ मतांच्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला आहे. त्यांनी भाजपचे (BJP) उमेदवार सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांचा पराभव केला होता.

Jayshree Jadhav
मी भाजपचा आमदार पण अजितदादा मला भरपूर निधी देतात : शिवेंद्रसिंहराजेंकडून जाहीर कौतूक

सतेज पाटील यांनी जयश्री जाधव यांच्या पहिल्या प्रचारसभेत बोलताना ही निवडणूक म्हणजे ‘आण्णांच्या माघारी, आता आपली जबाबदारी’ असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ही टॅगलाईन खरी करत महाविकास आघाडीने एकत्रित येत ही निवडणूक लढवली होती. या विजयानंतर जयश्री जाधव बोलताना, गट-तट बाजूला ठेवून महाविकास आघाडी एकत्र आल्याचा मला जास्त आनंद आहे. माझ्या या विजयाचं संपूर्ण श्रेय महाविकास आघाडीसोबतच सतेज पाटील, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर आणि कोल्हापूरच्या जनतेला दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com