जयंतरावांचा शंभूराज देसाईंना सूचक इशारा : आम्ही ताकदीने लढलो; तर टिकाव लागणार नाही!

मागील निवडणुकीत आपला पाटणमध्ये पराभव झाला. नाराजी असताना लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडली नाही. ही आपल्या पक्षाची जमेची बाजू आहे.
जयंतरावांचा शंभूराज देसाईंना सूचक इशारा : आम्ही ताकदीने लढलो; तर टिकाव लागणार नाही!
NCP Leader In PatanSarkarnama

पाटण (जि. सातारा) : ‘पाटण (Patan) तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची (ncp) प्रचंड ताकद आहे. सर्व कार्यकर्त्यांनी एकसंघ होत बूथ कमिट्या मजबूत कराव्यात.मागील निवडणुकीत आपला इथे पराभव झाला, मात्र या मतदारसंघातील आपल्या ताकदीचा वापर करून आपण भिडलो, तर विरोधकांचा टिकाव लागणार नाही,’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant Patil) यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना सूचक इशारा दिला आहे. (Jayant Patil's warning to Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai)

राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा आज (ता. १८ एप्रिल) सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यात ते बोलत होते. जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले की, मागील निवडणुकीत आपला पाटणमध्ये पराभव झाला. मात्र, मला इथल्या लोकांचे कौतुक करावेसे वाटते की कार्यकर्त्यांनी इथे पक्ष जिवंत ठेवला आहे. नाराजी असताना लोकांनी पक्षाची साथ सोडली नाही. ही आपल्या पक्षाची जमेची बाजू आहे.

NCP Leader In Patan
राज ठाकरेंनी आता कोणाची सुपारी घेतली, हे फडणवीसच सांगतील : पटोलेंचा टोला

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची ताकद एकसंध करण्याची वेळ आली आहे. आपण चांगल्या कामाच्या जोरावर मतं मागू. सर्व आधुनिक व्यवस्था आत्मसात करू आणि एकत्रितपणे यश संपादित करू, असा विश्वास व्यक्त करत जयंत पाटील म्हणाले की, महागाई, बेरोजगारी, आरोग्य यंत्रणा यावर कोणीच काही बोलत नाही. ईडी, आयटी, सीबीआय, भोंगा यावर चर्चा सुरू आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या अडचणी प्रदेशाध्यक्षांपुढे मांडल्या, जयंत पाटलांनी त्या ऐकून अडचणींची गांभीर्याने नोंद घेण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.

NCP Leader In Patan
तोळामासाची काँग्रेस सत्यजित देशमुखांना कोणत्या पदाचा शब्द देणार?

खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले की, रामालाही वनवास भोगावा लागला होता. तशीच आजची परिस्थिती आहे. नव्याने आपण उभे राहूया. मी वडीलधारा आहे, तुम्हाला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. पक्ष आपल्या पाठिशी खंबीरपणे आहे. संघटना मजबूत करा, असे आवाहनही पाटील यांनी केले.

NCP Leader In Patan
शिवसेनेत वाद पेटला : महिला शिवसैनिकांकडून शहरप्रमुखाला शाखेतच मारहाण

‘‘सगळ्या स्थानिक संस्थांमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुमत आहे. आता पक्ष वाढवायचा आहे, याची जबाबदारी प्रत्येक पदाधिकाऱ्यांने घ्यावी. पक्षाची नव्याने बांधणी करू, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तोंडावर आहेत, त्यासाठी आमचे सैन्य तयार आहे,’’ असा विश्वास माजी आमदार सत्यजित पाटणकर यांनी व्यक्त केला.

NCP Leader In Patan
'चंद्रकांत पाटलांनी २०१९ मध्ये केलेल्या दगाफटक्याचा शिवसैनिकांनी बदला घेतला'

या वेळी पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, सारंग पाटील, संकल्प डोळस, युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, महिला सरचिटणीस संगिता साळुंखे,तालुकाध्यक्ष राजाभाऊ शेलार, महिला तालुकाध्यक्ष स्नेहल जाधव, युवती अध्यक्ष रोहिणी पाटील, राजेंद्र लवंधरे, शफिस शेख, निवास आण्णा पाटील, राजेश पवार, रमेश मोरे, सुभाष पवार, गोरख नळवडे, शंकर शेडगे, गुरू शेडगे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.