Jayant Patil : निवडणुका पुढे ढकलण्याचा शिंदे-फडणवीसांचा प्लॅन

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी शिंदे-भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
Jayant Patil
Jayant PatilDatta Ingale

Jayant Patil : राज्यातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मतदार संघात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व युवा नेते आदित्य ठाकरे हे सभा घेत आहेत. त्यांत त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यावरून राज्यातील नागरिक हे शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात आहेत. आता निवडणूक झाल्यास त्याचा फटका बसण्याची शक्यता असल्याने निवडणुका पुढे ढकलण्याचा शिंदे-फडणवीस यांचा प्लॅन आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी केले.

अहमदनगरमधील राष्ट्रवादी भवनात जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक जयंत पाटील यांनी घेतली. या प्रसंगी आमदार आशुतोष काळे, संग्राम जगताप, नीलेश लंके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, माजी आमदार दादा कळमकर, नरेंद्र घुले, घनश्याम शेलार, कपिल पवार आदी उपस्थित होते.

Jayant Patil
Jayant Patil | अनेकांनी खोदून पाहिलं पण पाणी लागलं नाही

जयंत पाटील म्हणाले, राज्यातील बंडखोर आमदार व मंत्र्यांच्या मागण्या जास्त आहेत. त्यामुळे बंडखोर आमदारांत अस्वस्थता आहे. यातच बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन आदित्य ठाकरे सभा घेत आहेत. या सभांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावरून जनता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे. शिंदे गट व भाजप विरोधात जनतेत मोठा रोष आहे. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. आपला प्रयत्न निवडणुका लवकर व्हाव्यात असाच आहे. तर त्यांचा प्लॅन निवडणुका उशिरा व्हाव्यात असा आहे, असे त्यांनी सांगितले.

दसऱ्याला उद्धव ठाकरे मेळावा घेणार आहेत. त्यानंतर जनतेची रोष कळेल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची आघाडी व्हावी म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत. राष्ट्रवादीची ताकद वाढावी यासाठी पक्ष नोंदणी मोहीम महत्त्वाची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Jayant Patil
Jayant Patil : मनसेवर हिंदी भाषिकांचा राग, त्यामुळे पेच निर्माण होईल !

दिल्लीश्वरां पुढे मुख्यमंत्री गप्प

दिल्लीश्वरां पुढे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गप्प बसल्याने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेला. त्यामुळे महाराष्ट्राचे अतोनात नुकसान झाले. गुजरातपेक्षही जास्तचे पॅकेज महाराष्ट्राचे होते. महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन मंत्री सुभाष देसाई यांना सांगून तळेगाव दाभाडे परिसरात हा प्रकल्प होणार होता. महाराष्ट्राला 77 पैकी केवळ 3 गुण कमी होते. दिल्लीतील कोणाच्या तरी दबावाने प्रकल्प गेला. हे महाराष्ट्राच्या दृष्टीने वाईट झाले, अशी टीकाही त्यांनी केली.

महिला जिल्हाध्यक्ष लवकर निवडा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले आहे. या संदर्भात जयंत पाटलांनी सांगितले की, सर्वानुमते महिला जिल्हाध्यक्षाची लवकर निवड करा. जिल्हाभर फिरेल व बोलू शकेल अशी महिला निवडा, अशी सूचनाही त्यांनी केली. राष्ट्रवादी सभासद नोंदणी बाबतही त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in