Bazar Samiti Result : इस्लामपूर बाजार समितीवर जयंत पाटलांचे वर्चस्व कायम

Jayant Patil : भाजप-शिवसेनेच्या पॅनेलला एका जागेवर समाधान
Islampur Panel
Islampur Panel Sarkarnama

Islampur Bazar Samiti : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १८ पैकी १७ जागा जिंकत दणदणीत विजय मिळविला आहे. तर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीच्या पॅनेलने यश प्राप्त केले.

Islampur Panel
Pune Bazar Samiti : हवेली बाजार समिती निवडणुकीत अजितदादांना महेशदादांचा धक्का !

इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत (Islampur APMC) राष्ट्रवादी काँग्रेसने आपली एकहाती सत्ता राखली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पुरस्कृत पॅनलने १७ जागांवर विजय प्राप्त केला आहे. तर विरोधी सर्वपक्षीय आघाडीला हमाल तोलाईदार गटातील एका जागेवर समाधान मानावे लागले. या बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे वर्चस्व आहे. या निवडणुकीतही त्यांनी पुन्हा बाजार समितीवर दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले आहे.

Islampur Panel
Pusad Bazar Samiti : पुसद बाजार समितीवर मनोहर नाईक, इंद्रनील नाईकांचे वर्चस्व कायम; निलय नाईकांना धक्का!

सांगली जिल्ह्यातील (Sangli) सांगली बाजार समितीसाठी ९३.४५ टक्के तर इस्लामपूर बाजार समितीसाठी ८६.५७ टक्के आणि विटा बाजार समितीसाठी ९१. ३० टक्के इतके मतदान झाले होते. इस्लामपूर आणि विटा कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी शनिवारी (ता. २९) झाली. यात इस्लामपूर बाजार समिती राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलने १८ पैकी १७ जागा जिंकल्या. तर भाजप-शिवसेनेच्या पॅनेलला हमाल गटातील एक जागा मिळाली आहे.

Islampur Panel
Sangli Bazar Samiti : जयंतरावांनी सांगलीत मंत्री खाडे अन् संजयकाकांना धुळ चारली; आघाडीची निर्विवाद सत्ता

सांगलीत महाविकास आघाडीने निर्विवाद सत्ता राखली आहे. देशातील अग्रगण्य बाजार समिती मानल्या जाणाऱ्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आघाडीने सत्ता मिळवली आहे. १८ पैकी १७ जागांवर महाआघाडीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com