
सांगली - राज्यातील शिवसेनेच्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नाराजी सुरू झाल्याची चिन्हे आहेत. अडीच वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्रीपद व आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदापासून जयंत पाटलांना दूर ठेवण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ( Jayant Patil got upset? : Photos of NCP leaders disappeared from the board )
जयंत पाटील यांचे चिरंजिव प्रतीक पाटील यांच्या वाढदिवसाचे बॅनर सांगली जिल्ह्यात लावले जात आहेत. मात्र या बॅनरवर ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे फोटो व नावे नाहीत. त्यामुळे जयंत पाटलांच्या समर्थकांत नाराजी असल्याचे बोलले जात आहे. सांगलीतीलच आणखी एक नेते रोहित पाटील यांच्या अभिनंदन फलकावरूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची फोटो गायब होते. रोहित पाटील हे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांचे चिरंजिव आहेत.
फलकांवरून फोटो गायब करून नाराजी व्यक्त करण्याचा हा सांगली पॅटर्नतर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. की राज्यातील पक्षांतराचे वारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही शिरते आहे का? यावर उलटसुलट चर्चा रंगली आहे.
जयंत पाटील हे शरद पवार यांचे विश्वासू समजले जातात. 18 जुलैला प्रतीक पाटील यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त जिल्ह्यातील विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवरील शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो नसल्याने राष्ट्रवादीत नक्की काय चालले आहे. जयंत पाटील नाराज आहेत का?, शिवसेने प्रमाणे राष्ट्रवादीतही काही स्थित्यंतरे होणार का, अशी चर्चाही सुरू झाली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.