Jayant Patil : निर्यातीचा कोटा ठरविणे हा महाराष्ट्राच्या साखर उद्योगावर अन्याय

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
NCP leader Jayant Patil
NCP leader Jayant PatilSarkarnama

महेश माळवे

Jayant Patil : साखर निर्यातीला बंदी घालणं किंवा निर्यातीचा कोटा ठरवून देत साखर कारखान्यांना साखरेची निर्यात करण्यास मर्यादा घालणं हा महाराष्ट्राच्या साखर उद्योगावर अन्याय आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी केली.

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशमधील साखर कारखान्यांना विशेष करून जास्त खाजगी कारखान्याच्या राज्यात आहे, त्यांना विशेष कोट्यामध्ये सवलती दिल्या जात आहेत.

NCP leader Jayant Patil
Sangali : पराभवाच्या भीतीनेच निवडणूका लांबणीवर... जयंत पाटील

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र जे समुद्राच्या काठाला असलेले राज्य आहे अशा राज्याच्या साखर कारखान्याच्या साखरे निर्यातीला मर्यादा घालने हा महाराष्ट्राच्या साखर उद्योगावर अन्याय आहे. त्यामुळे एखाद्या साखर कारखान्याला जास्त साखर निर्यात करायची इच्छा असेल तर त्याला उत्तर प्रदेशच्या साखर कारखान्याला आधी पैसे द्यावे लागतील व नंतर त्यांचा कोटा विकत घेऊन मग निर्यात करावी लागेल. हे उचित आहे असे मला तरी वाटत नाही, असे सांगून सरकारच्या या धोरणा विरोधात देशाचे शुगर फेडरेशन व राज्याचा सहकारी साखर कारखान्याचा संघ निश्चितच केंद्र सरकारकडे या धोरणाकडे लक्ष वेधील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

NCP leader Jayant Patil
जयंत पाटील कडाडले; म्हणाले, मुख्यमंत्र्यांना स्वत:ला निर्णय घेता येत नाहीत...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली याविषयी बोलताना ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना शेवटपर्यंत साथ दिली आहे. त्यामुळे कोणताही वेगळा विचार राष्ट्रवादीचा नाही. शिंदे व पवार यांची भेट ही वैयक्तिक संबंधातून असून प्रकृतीच्या संदर्भात विचारपूस करण्यासाठीच शिंदे यांनी भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमा प्रश्न बोलताना ते म्हणाले की, दोन्ही राज्यात भाजपची सरकारी असून प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत हा प्रश्न सोडविण्यास ची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी. जळगाव येथे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांना सभा घेण्यास बंदी घातली याविषयी विचारला विचारले असता हा व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in