भाजपने बुजगावणी उभी केलीत; जयंत पाटलांची राज ठाकरेंवर नाव न घेता टीका

Jayant Patil| BJP| सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमानुसार भोंगे लावायला हरकत असण्याचे कारण नाही.
भाजपने बुजगावणी उभी केलीत; जयंत पाटलांची  राज ठाकरेंवर नाव न घेता टीका
Jayant Patil|

सांगली : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सांगलीत आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी राज्यातील घडामोडींकडे लक्ष वेधले आहे.

धर्म ही अफूची गोळी आहे, असं मार्क्स म्हणायचा. तशीच भाजपनेही सध्या देशाला ही अफूची गोळी दिली असून मूळ प्रश्‍नांपासून देशातील नागरिकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. काही बुजगावणी उभी करून जे स्वतः करू शकत नाही, ते त्यांच्याकडून करवून घेतले जात असल्याची घणाघाती टीका जयंत पाटील यांनी केली.

याचवेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावरही तोफ डागली आहे. 'केंद्रातील मोदी सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. मध्यवर्गीय, गरिबांना वाढ महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. संसार कसा करायचा हा लोकांपुढे प्रश्‍न आहे. पण अशातही धर्म नावाची अफूची गोळी दिली जात आहे. काही काळ माणूस त्या गुंगीत राहतो. पण रात्री झोपण्यापूर्वी त्याला उद्याचा दिवस कसा काढायचा, याची चिंता आहे. सामान्यांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे देशात भोंग्याचा मुद्दा तापवला जात आहे.’’

ते म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमानुसार भोंगे लावायला हरकत असण्याचे कारण नाही. तो नियम मोडेल, तो कोणत्याही धर्माचा असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल. पण मनसेने या विषयात दंगाच करायचा ठरवला आहे, पण त्यांची राज्यभर एवढी ताकद नाही. त्यांना इतर पक्षातून मदत झाली तर ते काही करण्याचे धाडस करत असतील, पण पोलिस सक्षम आहेत, ते बंदोबस्त करतीलच, असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला आहे.

याचवेळी त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर याच्यावरही निशाणा साधला आहे. गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजप नेत्यांना केंद्राकडून झटपट संरक्षण दिले जात आहे. या लोकांना कदाचित अतिरेक्यांपासूनही धोका असण्याची शक्यता आहे. त्यांना दाऊदचा फोन आला असावा, असेही जयंच पाटील यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.